निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:41 IST2025-10-10T13:40:07+5:302025-10-10T13:41:19+5:30
आरोग्य विभागाचा आणखी एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. शाळा, अंगणवाड्या आणि इतर संस्थांमधील लाखो मुलांना टेस्टमध्ये फेल झालेल्या एल्बेंडाझोल गोळ्या देण्यात आल्या.

फोटो - ndtv.in
मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे २३ मुलांचा मृत्यू झाला. याच दरम्यान आरोग्य विभागाचा आणखी एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. शाळा, अंगणवाड्या आणि इतर संस्थांमधील लाखो मुलांना टेस्टमध्ये फेल झालेल्या एल्बेंडाझोल गोळ्या देण्यात आल्या आहेत. जंतनाशक मोहिमेचा भाग म्हणून २३ आणि २६ सप्टेंबर रोजी मुलांना या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्यांची एक बॅच निकृष्ट दर्जाची असल्याचं आढळून आलं.
रिपोर्टनंतर ६ ऑक्टोबर रोजी, अशोकनगर सीएमएचओने गोळ्यांचं वितरण बंद करण्याचा आदेश जारी केला. एल्बेंडाझोल ४०० मिलीग्राम गोळीचा बॅच निकृष्ट दर्जाचा असल्याचं आढळून आलं. जंतनाशक मोहिमेतील या मोठ्या निष्काळजीपणाबद्दल अशोकनगर सिव्हिल सर्जनशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
"पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
मोठ्या निष्काळजीपणामुळे आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसह औषध नियंत्रकाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रुग्णालयांमध्ये पाठवलेल्या औषधाची प्रथम चाचणी का केली गेली नाही? असा सवाल विचारला जात आहे. लाखो मुलांना या गोळ्या वाटण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. चाचणी अहवाल अयशस्वी झाल्यावर, अशोकनगरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वितरण थांबवलं.
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
अशोकनगर जिल्हा आरोग्य विभागातील कोणतीही व्यक्ती या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यास तयार नाही. या निकृष्ट बॅच नंबरच्या गोळ्या किती मुलांना देण्यात आल्या याची संख्या देखील उघड केली जात नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या गोळ्याच्या सेवनामुळे कोणत्याही लहान मुलामध्ये दुष्परिणाम दिसल्याचं आढळून आलं नाही. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.