जिल्हाधिका-यावर बलात्काराचे आरोप करत मुख्यध्यापिकेचे घुमजाव

By Admin | Updated: March 3, 2015 10:38 IST2015-03-03T10:16:44+5:302015-03-03T10:38:35+5:30

पन्ना येथील जिल्हाधिकारी सरकारी कामानिमित्त घरी बोलवून लैंगिकशोषण करत असल्याचा आरोप एका शाळेतील मुख्यध्यापिकेने केला आहे.

The headmistress is accused of raping the district magistrate | जिल्हाधिका-यावर बलात्काराचे आरोप करत मुख्यध्यापिकेचे घुमजाव

जिल्हाधिका-यावर बलात्काराचे आरोप करत मुख्यध्यापिकेचे घुमजाव

>
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ३ - पन्ना येथील जिल्हाधिकारी सरकारी कामानिमित्त घरी बोलवून लैंगिकशोषण करत असल्याचा आरोप एका शाळेतील मुख्यध्यापिकेने केला होता. परंतू, २४ तासांतच या जिल्हाधिका-यांची तक्रार करणा-या मुख्यध्यापक बाईंनी जिल्हाधिकारी सज्जन असल्याचे म्हटले आहे. 
मुख्यध्यापिकेने पोलिसांत तक्रार नोंदवली असता पोलिसांनी जिल्हाधिकारी आर. के. मिश्रा यांच्यावर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत मिश्रा यांना पदावरून दूर करत भोपाळ येथे बदली करण्यात आली. पिडीत मुख्यधापक बाईंनी रविवारी आपल्या राहत्या घरी फिनेल प्यायल्यावर स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांची प्रकृती बिघडली असता पोलिसांनी मुख्यध्यापक बाईंची तक्रार नोंदवून घेतली, या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी सरकारी कामानिमित्त घरी बोलवून लैंगितशोषण करत व धमकी देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी मिश्रा यांना विचारले असता त्यांनी मुख्यध्यापिकेची मानसिकस्थिती ठीक नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तपाससुरू केल्यावर मुख्यध्यापक बाईंनी आपल्या तक्रारीवरून घुमजाव केले आहे. आपण घरकाम करणा-या बाईच्या चुकीमुळे फिनेल प्यायल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली असून न्यायलयात मुख्यध्यापक बाई आपला जबाब नोंदवून प्रकरण मिटवू शकतात असे पोलीस अधिक्षक आय.पी अरजरीया यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: The headmistress is accused of raping the district magistrate