Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:26 IST2025-11-25T09:22:23+5:302025-11-25T09:26:57+5:30
Hayli Gubbi Volcano Ash: दिल्लीपासून तब्बल ४५०० किलोमीटर दूर असलेल्या एका देशात ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखी स्फोटामुळे उत्तरेतील भारतीयांची चिंता वाढवली आहे.

Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Volcano Eruption Video: १२००० वर्षे शांत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. ज्वालामुखीच्या या स्फोटामुळे भारतावरही परिणाम झाला आहे. इथियोपियातील हैली गुब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर निर्माण झालेली राख प्रति तास १२० किमी इतक्या वेगाने भारतापर्यंत पोहोचली आहे. इंडियामेटस्काय वेदरच्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या राखेचे ढग सोमवारी (२४ नोव्हेंबर) रात्री पश्चिम भारतातील काही भागांमध्ये पोहोचले आणि उत्तरेकडील राज्याच्या दिशेने जात आहेत.
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर १४ किलोमीटर उंच राखेचा ढग तयार झाला असून, या ढगामुळे हवाई सेवेलाही फटका बसला आहे. भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात सावधगिरीची इशारा दिला आहे. अंदाजानुसार याचा परिणाम गुजरात, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब आणि हरयाणापर्यंत होण्याची शक्यता आहे.
🇪🇹🌋 Hayli Gubbi volcano erupts for the first time in 10,000 years
— Sputnik Africa (@sputnik_africa) November 24, 2025
The eruption sent a massive ash plume rising 10-15 kilometers into the sky.
📍 Northeastern Ethiopia pic.twitter.com/gHaDkA6XKz
महाराष्ट्रातील कोणत्या भागात राखेचे ढग?
इंडियामेटस्काय वेदरने याबद्दल म्हटले आहे की, राखेच्या ढगाने गुजरात (भारताच्या पश्चिमेकडून) मधून भारतात प्रवेश केला. रात्री १० वाजता राजस्थान, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा आणि पंजाबच्या दिशेने हे ढग सरकले आणि त्याने हिमालय आणि इतर क्षेत्रातही प्रवेश केला.
Update04:
— IndiaMetSky Weather (@indiametsky) November 24, 2025
The Ash cloud from #HayliGubbi volcano that erupted y’day about to reach #Delhi & #NCR and adjoining areas of #Haryana, #Punjab and #UttarPradesh in ~10 to 30 minutes. This mostly consists of SO2 and moderate concentrations of Volcanic Ash. The plume does not possess… https://t.co/ESm1xzrJDbpic.twitter.com/IGfC97LecZ
ज्वालामुखीच्या राखेत काय असते?
ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर राखेचे ढग आकाशात पसरले आहे. हे ढग प्रति तास १०० ते १२० किमी इतक्या वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकले. रिपोर्टनुसार, ज्वालामुखीच्या राखेत सल्फर डायऑक्साईड, काच आणि दगडाचे छोटे कण असतात.
इंडियामेटस्काय वेदरने इशारा दिला आहे की, राखेच्या ढगामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. म्हणजे राखेच्या धुरक्यामुळे समोरच्या गोष्टी अस्पष्टपणे दिसतील. त्याचबरोबर हवाई वाहतूक विस्कळीत होऊ शकते. राखेचे हे ढग समुद्रसपाटीपासून तब्बल २५००० ते ४५००० फूट इतक्या उंचीवरून सरकत आहे, त्यामुळे त्याचा हवेच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम पडणार नाही. राखेचे काही कण जमिनीवर पडू शकतात, पण त्याचीही शक्यता कमीच आहे, असेही इंडियामेटस्काय वेदरने म्हटले आहे.
Today's Hayli Gubbi (volcanic) eruption seen from space
— Science & Astronomy (@sci_astronomy) November 24, 2025
There are no known eruptions on record from the Hayli Gubbi in the past several thousands of years, which could mean it erupted after a potentially very long repose interval; however, records from the Danakil region are… pic.twitter.com/jaHvqMKZvQ
इथियोपियात काय घडले?
एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इथियोपियातील अफार भागात असलेल्या हैली गुब्बी ज्वालामुखी रविवारी सकाळी फुटला. त्यामुळे आजूबाजूची गावे धुळीने झाकली गेली आहेत. स्थानिक अधिकारी मोहम्मद सईद यांनी सांगितले की, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ज्वालामुखीच्या स्फोटामुळे स्थानिक लोकांवर आर्थिक स्वरुपात परिणाम होऊ शकतो. हैली गु्ब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाल्याची यापूर्वीची कोणतीही नोंद नाहीये.
एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, आम्ही प्रचंड मोठा आवाज ऐकला. त्यामुळे कंपणे जाणवली. असे वाटले की, धूर आणि राखेसह कुणीतरी बॉम्ब फेकला आहे.