शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! डबल डेकर बसची कारला धडक; ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:37 IST

यमुना एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे यमुना एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका भरधाव डबल डेकर बसने पुढे जाणाऱ्या इको कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात हाथरस जिल्ह्यातील सादाबाद कोतवाली परिसरातील गढी हरिया गावाजवळ झाला. पाठीमागून येणाऱ्या सुसाट बसने कारला धडक दिली, ज्यामध्ये कारचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. या अपघातात ६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. मृतांमध्ये राजस्थानच्या धोलपूरमधील एक दाम्पत्य आणि आग्रा येथील बाह परिसरातील एका दाम्पत्याचा समावेश आहे.

घटनेची माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक रामानंद कुशवाह यांनी सांगितलं की, "हा भीषण अपघात पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला. डबल डेकर बस दिल्लीहून गोरखपूरच्या दिशेने जात होती. सादाबाद परिसरातील गढी हरिया गावाजवळ पोहोचताच, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बसने पुढच्या कारला जोरात धडक दिली."

ही धडक इतकी भीषण होती की इको कारचे प्रचंड नुकसान झालं. अपघातानंतर एक्स्प्रेसवेच्या एका लेनवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) रामानंद कुशवाहा, एसडीएम मनीष चौधरी आणि तहसीलदार मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ७ जण सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Yamuna Expressway Accident: Bus Collides with Car, 6 Dead

Web Summary : Six people died and seven were seriously injured on the Yamuna Expressway in Hathras after a speeding double-decker bus collided with a car. The deceased include couples from Rajasthan and Agra. Police are investigating the accident, which disrupted traffic.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यूBus DriverबसचालकcarकारPoliceपोलिस