२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:43 IST2025-10-07T16:41:52+5:302025-10-07T16:43:59+5:30
माकडांच्या दहशतीमुळे दोन वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात आला आहे.

२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. माकडांच्या दहशतीमुळे दोन वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात आला आहे. माकडांनी हल्ला केल्यामुळे चिमुकली छतावरून खाली पडली. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, ज्यामध्ये मुलगी अचानक छतावरून खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे.
मुलगी तिच्या जुळ्या बहिणीसोबत छतावर खेळत असताना माकडांनी तिच्यावर हल्ला केला, ज्यामुळे ती खाली पडली. मुलीची आई दिव्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरातील कामं करत असताना मुलींचा ओरडण्याचा आवाज आला. त्या छतावर धावत गेल्या. त्यावेळी काही माकडांनी दोन्ही मुलींना घेरलं आणि हल्ला केला. मी एका मुलीला पटकन उचललं, पण दुसरी मुलगी छतावरून खाली पडली असं सांगितलं.
यूपी के हाथरस से एक दर्दनाक हादसे का वीडियो सामने आया है, जिसमें छत पर खेल रही दो साल की मासूम बच्ची पर बंदरों के झुंड ने हमला कर दिया, जिसके कारण बच्ची छत से नीचे गिर गई. बच्ची का इलाज मेडिकल कॉलेज में जारी है. pic.twitter.com/3b3cvgsdil
— Abhishek Kumar (@pixelsabhi) October 7, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलीचे वडील खाली उभे असल्याचे दिसत आहे. तेव्हाच अचानक मुलगी छतावरून खाली पडली. वडिलांनी तिला ताबडतोब उचललं आणि रुग्णालयात नेलं. मुलीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली आहे आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही पहिली घटना नाही. याआधी देखील अशा धक्कादायक घटना घडल्या आहेत. हाथरसमध्ये माकडांची दहशत पसरली आहे. अलिकडे माकडांची संख्या वाढली आहे. माकडांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.