शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Hathras Case : जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 50 कोटी पाठविले, ईडीचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 12:31 PM

Hathras Case : हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे.

लखनऊ : हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुरुवातीच्या अहवालावरून समोर येत आहे. तसेच, हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड आहे, असल्याचा पोलिसांनी केला आरोप आहे. यापूर्वी, यूपी पोलिसांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दंगलीच्या कट रचल्याचा दावा केला आहे.

हाथरस पीडितेला न्याय मिळावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या या वेबसाइटवर बर्‍याच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. ईडीने हाथरसमध्ये दंगलीचा कट रचण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे, की यूपीमध्ये जातीय दंगली परवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी देण्यात आला होता.

हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा यूपीच्या सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: विरोधकांवर जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याचा आरोप केला होता. त्यानंतर हाथरसमधीलघटनेविरोधात हिंसक निदर्शनांची तयारी सुरू होती, असा दावा युपीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम या नावाने ही वेबसाईट तयार केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय