संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:37 IST2025-12-01T10:34:34+5:302025-12-01T10:37:04+5:30
संसद ग्रंथालय मुख्यत्वे खासदार १ आणि लोकसभा व राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी यांच्यासाठी आहे.

संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
नवी दिल्ली: आपल्या भाषणांतून लोकांना उपदेश करणारे आणि शिकवणारे खासदार स्वतः मात्र वाचत नाहीत, असा एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हा खुलासा खुद्द संसदेच्या ग्रंथालयाच्या आकडेवारीतून झाला आहे.
मे २०२४ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, लोकसभेच्या सदस्यांपैकी केवळ ४२ खासदारच गेल्या सत्रात संसद ग्रंथालयातून पुस्तके घेण्यासाठी किंवा डिजिटल दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी गेले होते. उरलेल्या बहुसंख्य खासदारांनी एकही पुस्तक घेतले नाही.
ग्रंथालयात बाहेरील व्यक्तींना प्रवेश आहे का?
संसद ग्रंथालय मुख्यत्वे खासदार १ आणि लोकसभा व राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी यांच्यासाठी आहे. माजी खासदार आणि मीडिया गॅलरीतून मान्यताप्राप्त पत्रकार यांच्यासाठीही हे खुले आहे.
सामान्य जनतेला मात्र ग्रंथालयात प्रवेश दिला जात नाही. सामान्य नागरिक ऑनलाइन नोंदणी करून ग्रंथालयाच्या डिजिटल संसाधनांचा लाभघेऊ शकतात. खासदारांमध्ये वाचनाची सवय कमी होत असल्याने ग्रंथालयाचे अधिकारी-कर्मचारी चिंतेत आहेत.
संसदेच्या ग्रंथालयात आहे तरी काय?
संसद ग्रंथालयात ३४,५०० हून अधिक पुस्तके आहेत.
इंटरनेटवर ३५,००० च्या आसपास लेख (आर्टिकल्स) अपलोड केलेले आहेत.
ग्रंथालयाला २०० प्रकाशकांकडून ७५ विषयांवरील सुमा १२ दशलक्ष (१ कोटी २० लाख) जर्नल्सचा एक्सेस आहे.
याशिवाय ६१,००० व्हिडीओ आणि २४,००० ऑडिओ कॅसेटदेखील उपलब्ध आहेत.
नियमित भेट देणारे खासदार
जयराम रमेश
सुप्रिया सुळे
जॉन ब्रिट्टास
हरी भाई पटेल
जुगल किशोर शर्मा
रामजी लाल सुमन
प्रियंका चतुर्वेदी
गिरधारी लाल यादव
एस निरंजन रेड्डी
एम. पी. अब्दुस्समद समदनी