घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:27 IST2025-09-08T11:26:37+5:302025-09-08T11:27:22+5:30

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition | घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

थंडगार हवा देणारा एसी हा आजकाल प्रत्येकाच्या घरात असतो. चैनीची वस्तू म्हणण्यापेक्षा बदलत्या हवामानामुळे एसी एक गरजेचे साधन बनला आहे. मात्र, याच एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी सकाळी हरियाणातील फरीदाबाद येथील ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये एक दुःखद घटना घडली. या भागातील एका घरात एअर कंडिशनरचा स्फोट झाला आणि त्यामुळे मोठी आग लागली. या अपघातात कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

सोमवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. यावेळी संपूर्ण कुटुंब आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. त्यांना स्वतःला वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. पहिल्या मजल्यावरील आगीतून निघणारा धूर थेट दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. धुरामुळे खोलीत श्वास घेणे कठीण झाले आणि हळूहळू पती, पत्नी आणि त्यांची मुलगी गुदमरून मृत्युमुखी पडले.

अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचला
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. ग्रीन फील्ड कॉलनी पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवले. दुसरीकडे, अग्निशमन विभागाने मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

मुलाची प्रकृती चिंताजनक
हे कुटुंब बऱ्याच काळापासून ग्रीन फील्ड कॉलनीत राहत होते. या दुर्घटनेत कुटुंबातील मुलगा गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाईल. सध्या या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.

Web Title: Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.