शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

संवेदनहीनतेच्या सर्व मर्यादा पार; स्ट्रेचरवरच्या रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच बनवली उशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 10:40 AM

प्रदीपला स्ट्रेचरवरून नेताना डॉक्टर आणि वॉर्डबॉयनं त्यांच्या पायांनाच उशी बनवली.

नवी दिल्लीः फरिदाबादेतल्या सिव्हिल रुग्णालयात मानवतेला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर त्याला रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं. त्याचदरम्यान स्ट्रेचरवरून त्याला नेताना रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच उशी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातल्या भूड कॉलनीतील निवासी असलेले 42 वर्षीय प्रदीप शर्मा जवळच्याच एका कंपनीत कामाला होते. प्रदीप बडखल उड्डाणपुलाच्या खाली रेल्वे ट्रॅकजवळ कर्तव्याला होते. त्याचदरम्यान त्यांचे पाय रुळात अडकले, प्रदीप यांनी रुळातून पाय बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच भरधाव ट्रेन आली आणि प्रदीप यांचे पाय त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले. आजूबाजूच्या लोकांनी तत्परता दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस पुन्हा एकदा उघड झाला आहे.प्रदीपला स्ट्रेचरवरून नेताना डॉक्टर आणि वॉर्डबॉयनं त्यांच्या पायांनाच उशी बनवली. प्रदीपचे दोन्ही पाय स्ट्रेचरवर उशीच्या स्वरूपात दिसत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलचे कार्यवाहक अधीक्षक डॉक्टर विनय गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. रुग्णालयात तोकड्या सुविधा असून, रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक होतं. त्यावेळी जे शक्य होतं ते आम्ही केलं आहे. तर दुसरीकडे रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजपाल म्हणाले, एका व्यक्तीची रेल्वे रुळावर दुर्घटना झाल्याचं समजलं. परंतु आम्ही घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.