Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:01 IST2025-05-06T13:01:03+5:302025-05-06T13:01:20+5:30

Haryana Congress MLA Arrested: माजी काँग्रेस आमदार धर्मसिंह छोकर यांच्यावर दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

Haryana Ex Congress MLA Arrested in money laundering case | Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

Haryana Congress MLA  Arrested:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हरियाणातील माजी काँग्रेसआमदार धर्मसिंह छोकर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. छोकर आणि त्यांच्या कंपनीवर दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. दरम्यान, छोकर यांना अधिकाऱ्यांनी अटक करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत माजी काँग्रेसआमदार पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

सविस्तर माहिती अशी की, माजी काँग्रेस आमदार धर्मसिंह छोकर आणि त्यांची कंपनी M/s Sai Aaina Farms Pvt. Ltd. वर फसवणूक आणि पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. गुरुग्राम पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात ईडीचे अधिकारी छोकर यांना अटक करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी धावत जाऊन धर्मसिंग छोकर यांना पकडले. धावता-धावता छोकर पडले, यावेळी त्यांची ईडी अधिकाऱ्यांशी बाचाबाचीही झाली, यात माजी आमदाराचा शर्टही फाटला. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी कडक इशारा दिल्यानंतर छोकर गाडीत बसण्यास तयार झाले. या अटकेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मुलगा फरार, वडिलांना अटक
धर्मसिंह हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते हरियाणाच्या समलखा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. अटकेपूर्वी ईडीने त्यांच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यात पथकाला अनेक संशयास्पद व्यवहारांची माहिती. धर्मसिंह यांच्या मुलाविरोधातही ईडीने गुन्हा दाखल केला आहे. छोकरच्या अटकेनंतर ईडीची कारवाई आणखी तीव्र झाली आहे. विकास छोकर सध्या फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

 

Web Title: Haryana Ex Congress MLA Arrested in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.