शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:46 IST

Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: नायबसिंग सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले

Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. राज्यात भाजपा पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल हे जवळपास निश्चित आहे. नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत भाजपाने अप्रतिम कामगिरी केली. निवडणुकीच्या सहा महिने आधी भाजपने हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावरून मनोहर लाल खट्टर यांना हटवून नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली होती. जातीय समीकरणानुसार हा निर्णय भाजपसाठी अगदी योग्य ठरल्याचे दिसले आणि हरयाणामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. अवघ्या ६ महिन्यात ते हरयाणाचा हिरो बनले. जनतेच्या मनात प्रस्थापितांविरोधात असलेला रोष (Anti incumbency) झटकून टाकण्यात त्यांना यश आले. हरयाणातील भाजप विरूद्ध काँग्रेस सामन्यात मुख्यमंत्री नायब सैनी 'मॅन ऑफ द मॅच' ठरले. जाणून घेऊया त्यांच्याकडील संपत्ती किती?

नायबसिंग सैनी यांची नेटवर्थ

नायबसिंग सैनी हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यांची संपत्ती कोट्यवधींची असून, त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची माहिती दिली होती. त्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती (Nayab Singh Saini Net worth) ५,८०,५२,७१४ रुपये आहे, तर त्यांच्यावर ७४,८२,६१९ रुपये कर्ज आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ३,५७,८५,६२१ रुपये होती आणि त्यांच्यावर ५७,३४,८७८ रुपयांचे कर्ज होते.

बँक खात्यात इतकी रक्कम जमा

MyNeta.info वर शेअर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या मालमत्तेचा तपशील देताना विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे १.७५ लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगितले होते. त्यांच्या पत्नीकडे १.४० लाख रुपयांची रोकड होती. तसेच त्यांची पत्नी आणि मुलांच्या विविध बँकांमध्ये उघडलेल्या खात्यांमध्ये ३६ लाखांहून अधिक रक्कम जमा होती. गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी त्यांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

PPF-LIC मध्ये गुंतवणूक केली

त्यांचे पीपीएफ खाते आहे, ज्यामध्ये ८,८५,५९२ रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या नावावर २ लाख रुपयांची LIC पॉलिसीही सुरू आहे. दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, नायब सिंग सैनी यांच्याकडे ३० ग्रॅम सोने (किंमत सुमारे २ लाख रुपये), त्यांच्या पत्नीकडे १०० ग्रॅम सोने (सुमारे ६.४० लाख रुपये) आणि मुलांच्या मालकीच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.

वाहने आणि स्थावर मालमत्ता

वाहनांबाबत सांगायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, नायबसिंग सैनी यांच्या नावावर तीन वाहने आहेत, यामध्ये दोन टोयोटा इनोव्हा आणि एक क्वालिस कारचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर सुमारे ६५ लाख रुपयांची शेतजमीन आहे, तर त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या निवासी इमारतींची एकूण किंमत ४.२० कोटी रुपये आहे.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाcongressकाँग्रेस