शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Happy New Year 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 8:36 AM

सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2020 चे स्वागत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. '2020 च्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो'पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2020 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'2020 च्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (1 जानेवारी) हे ट्विट केलं आहे. तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी प्रार्थना केली आहे.

'2020 हे वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि प्रत्येक देशवासी सक्षम, सबळ होईल अशी आशा करूया' असं ट्विट करण्यात आले आहे. मोदींनी NaMo 2.0 या ट्विटर हँडलने केलेल्या एका ट्विटच्या उत्तरादाखल हे ट्विट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते मंडळींनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर 2020, #न्यू ईअर, #गुडबाय 2019, #वेलकम 2020 असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात संपूर्ण मुंबईकर रंगून गेले होते. वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि कार्यक्रमाला मंगळवारच्या सायंकाळपासूनच सुरुवात झाली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहर रोषणाईने झगमगले होते. या रोषणाईत मंगळवारी आकाशातील आतषबाजीचीही भर पडली. शहरात तुरळक ठिकाणी नव्या वर्षांच्या आगमनावेळी फटाके फोडण्यात आले, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती. नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, येथे मुंबईकरांनी गर्दी केली. महाविद्यालयीन तरुणांची तर यामध्ये खास उपस्थिती होती, तसेच अनेकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आनंदाचे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

चौपाट्यांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. संध्याकाळनंतर किनाऱ्यांवरची गर्दी वाढत गेली की, नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत बसण्यासाठी लोकांना जागा शोधावी लागत होती. अनेक पर्यटक मध्यरात्री उशिरापर्यंत किनाºयांवर रेंगाळत होते. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर, पर्यटनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारे संदेश, ग्रीटिंग कार्ड इत्यादी भेटवस्तू तरुणाईने आपल्या प्रियजनांना दिल्या.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Yearनववर्षIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे