शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या कुटुंबाकडेच वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्मलग्रामकडे दुर्लक्ष : मोठ्या गावांतील नागरिकांकडून टाळाटाळ

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

रेणापूर : तालुक्यातील ६६ गावांतील २३ हजार ९२७ कुटुंबांपैकी केवळ १२ हजार ४५७ कुटुंबांकडेच स्वच्छतागृहे असल्याची माहिती निदर्शनास आली आहे़ त्यामुळे तालुक्यातील गावे निर्मलग्राम योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़

रेणापूर : तालुक्यातील ६६ गावांतील २३ हजार ९२७ कुटुंबांपैकी केवळ १२ हजार ४५७ कुटुंबांकडेच स्वच्छतागृहे असल्याची माहिती निदर्शनास आली आहे़ त्यामुळे तालुक्यातील गावे निर्मलग्राम योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़शासनाच्या वतीने गाव पाणंदमुक्त व निर्मल करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु, तालुक्यातील बहुतांशी गावांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे़ तालुक्यात ६६ गावे असून २३ हजार ९२७ कुटुंबे आहेत़ त्यापैकी केवळी १२ हजार ४५७ कुटुंबाकडे स्वच्छतागृहे आहेत़ उर्वरित ११ हजार ४७० कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गावनिहाय कुटुंबांतील स्वच्छतागृहांची आकडेवारी व कंसात स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे- आनंदवाडी ६८ (७२), आंदलगाव १४५ (६), आरजखेडा ७२ (१४०), असराचीवाडी २५ (९१), बावची २८ (१६३), भंडारवाडी १२३ (६१), भोकरंबा २७४ (२६५), बिटरगाव ५७ (३२५), चाडगाव १२२ (५५), दर्जी बोरगाव ९० (३२८), धवेली ४३ (१५६), डिगोळ देशमुख १३६ (२८३), दिवेगाव १०६ (३१), फरदपूर ५८ (१५५), गरसुळी ८२ (२४८), गव्हाण ११० (८२), घनसरगाव १५८ (२८१), गोढाळा १९२ (२३५), हारवाडी १४८ (२३६), व्हटी १९२ (७५), इंदरठाणा १२८ (८६), इटी २३२ (३८), जवळगा १२९ (३०४), कामखेडा १९८ (२९७), कारेपूूर २६८ (३८५), खलंग्री १२३ (१२०), खरोळा ५३६ (६१८), कोळगाव ११४ (११०), कोष्टगाव १३९ (५८०), कुंभारवाडी १६८ (४९), माकेगाव ७९ (१६३) माणूसमारवाडी १२२ (१६५), मोहगाव ११९ (६०), मोरवाड २६९ (५१), मोटेगाव २०६ (२०९), मुरढव १४६ (१३७), मुसळेवाडी १५३ (१०१), नरवटवाडी ३६ (३३), निवाडा १३८ (१९५), पळशी १६८ (३४), पानगाव ५६३ (११५२), फावडेवाडी १७८ (९१), पोहरेगाव ६३६ (४६१), रामवाडी १८० (११), रामवाडी (पा.) ६० (२८), रेणापूर २३१६ (९९४), समसापूर १२० (१५२), सांगवी १४९ (१४१), सारोळा १०३ (९१), सय्यदपूर १०९ (४०), शेरा १३३ (१३७), सिंधगाव १८८ (२६४), सुमठाणा १४४ (७९), टाकळगाव ८४ (१०४), तळणी १७८ (२००), तत्तापूर १४६ (१२२), वाला २१४ (३४), वांगदरी १०३ (२०५), वंजारवाडी १५२ (५८), यशवंतवाडी ३८ (७८) अशी आहे़ निर्मलग्राम योजनेतून स्वच्छतागृह बांधलेल्यास शासनाच्या वतीने प्रत्येकी ४ हजार ६०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे़कोट़़़तालुक्यातील गावे निर्मल ग्राम व्हावीत म्हणून पंचायत समितीच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत़ त्यास अल्प प्रतिसाद आहे़ तो वाढावा म्हणून कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे पंचायत समितीतील स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले़