काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:35 IST2025-09-27T09:34:27+5:302025-09-27T09:35:08+5:30
हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. थारमध्ये एकूण सहा जण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यूपी ८१ सीएस २३१९ नंबर असलेल थार दिल्लीहून झाडसा चौक एक्झिट क्रमांक ९ वरून जात असताना ती थेट डिव्हायडरवर आदळली. अपघात इतका भीषण होता की थारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
पाच जणांचा जागीच मृत्यू
थारमधील सहा जणांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुणांचा समावेश आहे. एका तरुणाला गंभीर अवस्थेत गुरुग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुरुग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
एकाची प्रकृती गंभीर
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थारमधून सहा जण प्रवास करत होते. थार वेगात असल्याने त्यावरील नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हायडरला धडकली. पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.