पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:00 PM2021-06-18T17:00:26+5:302021-06-18T17:02:33+5:30

"या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत."

Gujarat Surat councillor political differences divide from husband | पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

Next

सूरत - राजकीय मतभेदांमुळे गुजरातमधील सूरत येथे एका तरूण इंजिनिअर दांपत्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली. पत्नी आम आदमी पार्टीची (आप) नगरसेविका असून या जोडप्याने नुकताच एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. रुता दुधागरा आणि चिराग असे या दांपत्याचे नाव आहे. (Gujarat Surat councillor political differences divide from husband)

26 वर्षीय नगरसेविका रुता दुधागरा आता पति चिराग (28) यांच्यांकडून त्यांचे वैयक्तीक साहित्य, जसे शाळा आणि कॉलेजच्या मार्कशीट्स, काही महत्वाची कागदपत्रे, त्यांच्या नगरसेवकपदाशी संबंधित काही दस्तऐज, त्यांची मोपेड आणि लॅपटॉपसह इतर मौल्यवान साहित्य घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहेत.

पतीला घटस्फोटासाठी दिले 7 लाख रुपये -
आयटी इंजिनिअरने सांगितले, की 'माझे पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होते. यामुळे मी त्यांना 7 लाख रुपये दिले आणि त्यांनी माझे 90 ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले दागिने घेतले आहेत. रोख दिलेले पैसे सेपरेशनसाठी होते, असे मी मानते. मात्र, आता मी माझे दस्तऐवज घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहे.'

दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

3 वर्षांपूर्वीच झाले होते लग्न -
नगरपालिका निवडणुकीत दुधागरा यांना 54,754 मते मिळाली आणि त्यांनी फेब्रुवारी महिन्यात वार्ड 3, सरथाना-सिमाडा येथून भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्या म्हणाल्या, 'माझ्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता. मात्र, मी आपसोबत कल्याणकारी कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मला नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले आणि मी सर्वाधिक अंतराने विजयी झाले.' तसेच आपले लग्न गेल्या तीन वर्षांपूर्वी कंप्यूटर इंजिनिअर चिराग सोबत झाले होते. त्यांना अद्याप मूल नाही.

'भाजप जॉइन करण्यासाठी टाकत होते दबाव' -
रुता म्हणाल्या, 'माझे माझ्या पतीसोबत गेल्या एक वर्षापेक्षाही अधिक काळापासून मतभेद होते. मात्र, आम्ही अॅडजस्ट करत होतो. मात्र, माझ्या विजयानंतर काही आठवड्यांतच माझ्या पतीने माझ्यावर भाजपत सामील होण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यासाठी त्यांना कोट्यवधींचा प्रस्तावही भेटला आसेल. मात्र, मी आम आदमी पार्टी सोडणार नाही.'

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

93 पैकी 27 जागा 'आप'कडे -
रुता म्हणाल्या, 'या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत आणि त्यांनी माझे महत्वाचे दस्तऐवजही परत केलेले नाहीत. यामुळे, आता मी कायदेशीर पर्याय शोधत आहे.' AAP ने शहरातील पाटीदार बहूल भागांत 93 पैकी 27 जागा जिंकल्या आहेत.

Web Title: Gujarat Surat councillor political differences divide from husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.