दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:40 PM2021-06-18T15:40:13+5:302021-06-18T15:42:40+5:30

Couple sells newborn for Rs 3.6 lakh : "ठरल्याप्रमाणे, बालकाच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये रोख दिले गेले. दोन्ही जोडप्यांमध्ये करार झाला आणि गोविंद आणि पूजा यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचे चार धनादेश देण्यात आले.

The couple sold the newborn for Rs 3.5 lakh; Police arrest 6 | दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

Next
ठळक मुद्देगोविंद कुमार (३०) आणि त्यांची पत्नी पूजा देवी (२२) यांनी त्यांच्या नातेवाईक हरिपालसिंग (५०) यांच्यावर १५ जून रोजी सकाळी अपहरण केल्याचा आरोप केला.

दिल्लीपोलिसांनी गुरुवारी एका नवजात बालकाची विक्री केली आणि नंतर पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली. सहा आरोपींमध्ये सहा दिवसांच्या मुलाच्या पालकांचा समावेश आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन पुरुषांना मुलाच्या खरेदीसाठी दुसर्‍या जोडप्याशी कथितपणे मध्यस्थी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी त्यांना एका जोडप्याचा फोन आला, अशी माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्या मुलाला त्यांच्या नातेवाईकांनी अपहरण केल्याचा आरोप केला आहे. गोविंद कुमार (३०) आणि त्यांची पत्नी पूजा देवी (२२) यांनी त्यांच्या नातेवाईक हरिपालसिंग (५०) यांच्यावर १५ जून रोजी सकाळी अपहरण केल्याचा आरोप केला.


ही माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अपहरण प्रकरणाबद्दल उत्तर प्रदेशातील त्यांच्या पथकास सतर्क केले आणि कानपूर रेल्वे स्थानकात अपहरण झालेल्या मुलाला घेऊन जात असल्याचा आरोप असलेल्या आणखी एका जोडप्याचा शोध घेण्यास सांगितले. आणखी एक जोडपे - विद्यानंद यादव (५०) आणि त्यांची पत्नी रामप्रीदेवी (४५) यांना बाळासह पकडले आणि चौकशीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर विद्यानंद यादव आणि रामपरी देवी यांनी गोविंद कुमार आणि पूजा देवींकडून मुलाला लाखो रुपयांच्या बदल्यात विकत घेतल्याचे उघडकीस आले.

"आम्हाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून माहिती मिळताच आमचे पथक त्वरित कानपूरला गेले. परंतु, जेव्हा आम्ही त्या जोडप्यास भेटलो तेव्हा त्यांनी त्याचे अपहरण झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी पैसे दिल्यानंतर बालकाला विकत घेतल्याचे सांगितले. पोलीस आश्चर्यचकित झाले. पोलीस पुढे म्हणाले की, या कराराचे पत्र होते. आम्ही हे अपहरण प्रकरण मानतो, असे पोलिस उपायुक्त (दक्षिण) अतुल ठाकूर यांनी सांगितले.

गोविंद आणि त्यांची पत्नी पूजा यांच्या जबाबामध्येही पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या.अतिरिक्त पोलिस उपायुक्त हर्ष वर्धन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, "मुलाला विकल्यानंतर आईची अंतःकरण देखील बदललं. या जोडप्याने आम्हाला अया नगरमधील हरिपालच्या घराबद्दल सांगितले. पण त्यांना घरचा नेमका नंबर माहित नव्हता. हरिपालला पकडले असता त्याने सांगितले की, या जोडप्याने मुलाला ३. ६ लाख रुपयांना विकले आहे. "

अतिरिक्त डीसीपीने सांगितले की, "हरिपालला आपल्या नातेवाईक विद्यानंद आणि रामपरी यांना रमण यादव मुलं विकणार हे माहित होतं. विद्यानंद आणि रामपरी यांच्या लग्नाला २५ हून अधिक वर्ष झाली होती, पण त्यांना मूलबाळ नव्हते."

"ठरल्याप्रमाणे, बालकाच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये रोख दिले गेले. दोन्ही जोडप्यांमध्ये करार झाला आणि गोविंद आणि पूजा यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचे चार धनादेश देण्यात आले. कदाचित त्यांचे मन बदलले असेल आणि त्यानंतर त्यांनी तीन दिवसानंतर बनावट तक्रारीसह पोलिसात धाव घेतली  " अतिरिक्त डीसीपी पुढे म्हणाले.
तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की, मुलाचा जन्म ८ जून रोजी गुरुग्राम रुग्णालयात झाला होता. त्यानंतर मुलाला आणि त्याच्या आईला १० जूनला सोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी आरोपी नवी दिल्लीच्या अया नगर येथील हरिपालच्या घरी भेटले होते.

Web Title: The couple sold the newborn for Rs 3.5 lakh; Police arrest 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app