अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागवले; 12 वर्षीय मुलाने नवव्या मजल्यावरुन मारली उडी, जागीच मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:47 IST2025-10-07T11:46:55+5:302025-10-07T11:47:20+5:30
Gujarat: एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागवले; 12 वर्षीय मुलाने नवव्या मजल्यावरुन मारली उडी, जागीच मृत्यू...
Gujarat: गुजरातच्यासूरत जिल्ह्यातील उधना परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 12 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या घराजवळील इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासासाठी पालकांनी फटकराले, याचाच राग मनात धरुन या विद्यार्थ्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यामध्ये तो लिफ्टने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाताना दिसतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, अवनीश तिवारी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. नवव्या मजल्यावरुन खाली पडताच अनवीशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली. त्या इमारतीमधील अवनीशला ओळखत नव्हते, त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी त्याचा मृतदेह अज्ञात म्हणून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. नंतर माहिती मिळताच त्याचे कुटुंब तेथे पोहोचले.
अवनीश तिवारी आपल्या आई-वडिलांसोबत उधना येथील प्रभुनगर सोसायटीत राहत होता. तिवारी कुटुंबात फक्त आई, वडील आणि अवनीश असे तिघेच होते. अवनीश सातव्या इयत्तेत शिकत होता. सध्या त्याच्या परीक्षा सुरू होत्या. एकच पेपर शिल्लक होता. घरच्यांकडून त्याला अभ्यासावर लक्ष देण्यासाठी वारंवार सांगितले जात होते, पण त्याला अभ्यासात फार रस नव्हता. सोमवार सकाळी तो घरातून बाहेर पडला आणि शुभम रेसिडेन्सीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल समाज आणि पालक दोघांनीही अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. अभ्यासाचा दबाव आणि पालकांची अपेक्षा काही वेळा मुलांच्या मनावर इतका खोलवर परिणाम करतात की, ते असे टोकाचे निर्णय घेतात.