शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

...तर गुजरातमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:02 IST

भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदाबाद - भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. काल गुजरातमधील निकाल लागेल्या जागंमध्ये 12 जागा अशा आहेत तिथे अत्यंत कमी फरकाने विजय मिळवण्यात आला आहे. त्यापैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निसटत्या फरकाने पराभूत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले. 150 जागा जिंकणार असे भाकित करणाऱ्या मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. 

गुजरात निवडणुकीत काँग्रेसला बहुमतासाठी 12 जागां कमी पडल्या. भाजपने 99 जागा जिंकत सहाव्यांदा सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. निकाल लागेल्या जागंमध्ये 12 जागा अशा आहेत तिथे अत्यंत कमी फरकाने विजय मिळवण्यात आला आहे. त्यापैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निसटत्या फरकाने पराभूत झाला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी बसपा तर काही ठिकाणी अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे चित्र समोर आले आहे. 

भाजपाविरोधी मतांमध्ये फाटाफूट झाली नसती तर कदाचित काँग्रेसला गुजरातमध्ये बहुमत मिळालं असतं. 8 पैकी 3 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे उमेदवार हरले आहेत. केवळ 327 मतांनी धोलका मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकला. त्या ठिकणी बसपाच्या उमेदवाराने 3 हजारांपेक्षा जास्त तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 1100 पेक्षा जास्त मते घेतली. 2711 मतांनी फतेपुरा मतदारसंघात भाजपचा उमेदवार  जिंकला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2747 मते मिळाली. डांग्ज मतदारसंघात भाजपचा उमेदवार केवळ 768 मतांनी जिंकून आला आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 1304 मते मिळाली आहेत.

राहुल गांधींच्या देवदर्शनाचा काँग्रेसला लाभ -

निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर राहुल गांधींच्या या टेम्पल रनचा काँग्रेसला जागांच्या रुपाने आशीर्वाद मिळाल्या दिसत आहे. द्वारकाचा अपवाद वगळता राहुल गांधींनी ज्या मंदिरांना भेट दिली त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल गांधींनी संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 27 मंदिरांना भेट दिली त्यातील 18 मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. द्वारकेतील द्वारकाधीश मंदिरापासून राहुल गांधींच्या ''टेम्पल रनला'' सुरुवात झाली होती. पण द्वारकेतून भाजपाचे पाबूभा मानेक सलग सातव्यांदा विजयी झाले. 

राहुल गांधींनी अंबाजी मंदिर (दंता),  बहुचराजी माता मंदिर (बेचरजी), चामुंडा माता मंदिरा (चटिला), स्वामिनारायण मंदिर (गाधाडा), अक्षरधाम मंदिर ( उत्तर गांधीनगर), वीर माया मंदिर (पाटण), सोमनाथ मंदिर, उमिया माता मंदिर (ऊँझा), शामलाजी मंदिर (भिलोडा), रणछोडजी मंदिर डाकोर (थासरा), कबीर मंदिर (दाहोड), रणछोडजी मंदिर (पेटलाड), उनाय माता मंदिर (वनसदा), खोदीयार माता मंदिर आणि सदाराम बापा मंदिर (राधनपूर), देव मोग्रा माता मंदिर (देदीयापाडा) आणि वलिनाथ मंदिर ( वाव) या मंदिरांना भेट दिली. ही मंदिर ज्या मतदारसंघांमध्ये आहेत तिथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. राहुल गांधींच्या ''टेम्पल रन''मध्ये काँग्रेसने आता ज्या 18 जागा जिंकल्या आहेत त्यातील 10 जागा 2012 मध्ये भाजपाने जिंकल्या होत्या 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसBJPभाजपा