“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:57 IST2022-11-24T17:56:36+5:302022-11-24T17:57:26+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच चर्चेदरम्यान त्यांनी त्यांचा गद्दार असा उल्लेखही केला.

“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गुजरातमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीकेचा बाण सोडला. तसंच संवादादरम्यान अनेक त्यांनी पायलट यांना गद्दार असंही संबोधलं.
“एक गद्दार मुख्यमंत्री बनू शकत नाही. हायकमांड सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवू शकत नाही. एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे १० आमदारही नाहीत. अशी व्यक्ती ज्यानं बंडखोरी केली, त्यानं पक्षाला धोका दिला, ती व्यक्ती गद्दार आहे,” असं गहलोत म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी २०२० मध्ये झालेल्या बंडखोरीवर सविस्तर चर्चाही केली.
“असं भारतात पहिल्यांदाच घडलं असेल, जेव्हा एका पक्षाच्या अध्यक्षानं आपलंच सरकार पाडण्याचे प्रयत्न केले,” असं ते म्हणाले. तसंच भाजपनं याला पैसा पुरवल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच यामागे अमित शाह यांच्यासह भाजपच्या जेष्ठ नेत्यांचा सावेश होता असंही ते म्हणाले.
थेट आव्हान
“दोन वर्षे उपमुख्यमंत्री असलेले पायलट १९ आमदारांसह दिल्लीच्या जवळली एक पंचतारांकित रुग्णालयात गेले होते. आपल्याला मुख्यमंत्री करावं किंवा काँग्रेस सोडू हे काँग्रेसला थेट आव्हान होते. याचमुळे काहीच राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षात एका राज्यात फुट पडली,” असं गहलोत यांन नमूद केलं.
गांधी कुटुंबीयांवर निष्ठा
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीदरम्यान गांधी कुटुंबीयांवर आपली निष्ठा कायम होती. माझ्याकडे जे काही आहे, ते त्यांच्याचमुळे असल्याचं गहलोत म्हणाले.