एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 00:40 IST2025-11-29T00:38:49+5:302025-11-29T00:40:09+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेप्रति तरुणाच्या मनात एकतर्फी आकर्षण होते. मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव कामरान शाहिद पठाण असे आहे.

एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात तरुणीसोबत झालेल्या वादानंतर एका तरुणाने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली. तरुणीसोबत भांडण झाल्यावर त्याने स्वतःवर पेट्रोल टाकून लायटरने पेटवून घेतले. आग लागल्यानंतर त्याने हॉस्पिटलच्या छतावरून खाली उडी मारली. घटनास्थिळी असलेले लोक त्याला बघतच राहिले. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण सरखेज येथील अलनूर हॉस्पिटलमध्ये तरुणीला भेटायला आला होता. तरुणीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर त्याने रुग्णालयात तोडफोड केली. यानंतर त्याने स्वतःवर पेट्रोल ओतून घेत आग लावली आणि हॉस्पिटलच्या छतावरून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर, लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीच्या भीषण ज्वाळांमुळे ते शक्य झाले नाही.
तरुणाची ओळख पटली, तपास सुरू -
सरखेज येथील ही घटना अक्षरशः थरकाप उडवणारी आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेप्रति तरुणाच्या मनात एकतर्फी आकर्षण होते. मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव कामरान शाहिद पठाण असे आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणाची सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू आहे, असे एम डिव्हिजनचे एसीपी ए. बी. वाडंद यांनी म्हटले आहे.