ज्ञानाच्या पलिकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक
By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST
विजय मोहिते : लोकशिक्षक पुरस्काराचे वितरण
ज्ञानाच्या पलिकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक
विजय मोहिते : लोकशिक्षक पुरस्काराचे वितरणपुणे : अनेक व्यक्ती समाजासाठी चांगले कार्य करीत असतात. परंतु सामाजातील घटकांमध्ये भेदभाव न करता निरपेक्षपणे काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असतो. शिक्षक शिष्याला फक्त ज्ञान देण्याचे काम करीत नाही. तर ज्ञानाच्या पलिकडे जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम करतो, असे मत रामराज्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय मोहिते यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व सेवा मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात शशिकांत ठाकूर स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार तबला वादक पंडित पांडुरंग मुखडे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शाहीर दादा पासलकर, आमदार भिमराव तापकीर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष तन्मय तोडमल, नगरसेवक विशाल तांबे, आप्पा रेणूसे, ॲड. सुभाष मोहिते, आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते.विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या शिक्षकांना संस्थेतर्फे लोकशिक्षक पुरस्कार दिला जातो. पासलकर म्हणाले, आजच्या विज्ञान युगात गुरू-शिष्याचे नाते लोप पावत चालले आहे. गुरू शिष्याचे नाते टिकवणे, ही आजच्या शिक्षकांसाठी तारेवरची कसरतच आहे. गुरू-शिष्याचे नाते टिकून राहण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवाद महत्वाचा आहे. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले. फोटो टी सीटी फोटो ११६१ओळ पुरस्कार : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व सेवा मित्रमंडळ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) तन्मय तोडमल, दादा पासलकर, विजय मोहिते, पांडुरंग मुखडे, महानंदा मुखडे, हेमंत मावळे, पराग ठाकूर.