CAAला पाठिंबा देण्यासाठी मेहंदी काढून आला नवरा, गायीला साक्ष ठेवून केला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:48 PM2020-02-04T15:48:28+5:302020-02-04T17:58:41+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

groom performed wedding rituals with cow supports caa in his mehendi at surat | CAAला पाठिंबा देण्यासाठी मेहंदी काढून आला नवरा, गायीला साक्ष ठेवून केला विवाह

CAAला पाठिंबा देण्यासाठी मेहंदी काढून आला नवरा, गायीला साक्ष ठेवून केला विवाह

Next
ठळक मुद्दे गुजरातमध्ये एका अनोख्या विवाहाची चर्चा रंगली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये सीएएला पाठिंबा देण्यासाठी एका नवरदेवाने सीएएची मेहंदी काढली आहे. गाईला साक्ष ठेवून त्याने विवाह केला आहे.

सूरत - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. याच दरम्यान गुजरातमध्ये एका अनोख्या विवाहाची चर्चा रंगली आहे. 

गुजरातच्या सूरतमध्ये सीएएला पाठिंबा देण्यासाठी एका नवरदेवाने सीएएची मेहंदी काढली आहे. तसेच गाईला साक्ष ठेवून त्याने विवाह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला हा विवाह सोहळा संपन्न झाला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी. या कायद्यासंबंधीत सर्व गोष्टी लोकांना समजाव्यात यासाठी सीएएला पाठिंबा देत आहे. त्यामुळेच मेहंदीतून सीएएचा प्रचार करत असल्याची माहिती नवरदेवाने दिली आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला होता. नरसिंहपूर जिल्ह्यातील एका तरुणाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आपल्या लग्नपत्रिकेवरच पाठिंबा दर्शवला. प्रभात असं या तरुणाचं नाव असून त्याने लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिला होता. शनिवारी (18 जानेवारी) प्रभातचा विवाह संपन्न झाला. उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील एका कुटुंबानेदेखील लग्नात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला. लग्नपत्रिकेवर We support CAA and NRC असं मोठ्या अक्षरात छापण्यात आले होते. त्यांनी लग्नपत्रिकेत सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शवला होता. 

महत्त्वाच्या बातम्या 

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा

...म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

 

Web Title: groom performed wedding rituals with cow supports caa in his mehendi at surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.