Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:25 AM2020-02-04T11:25:26+5:302020-02-04T11:40:45+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे.

Delhi Election 2020 : Opinion Poll: AAP will win in Delhi assembly Election | Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

Next
ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष 54 ते 60 जागा जिंकेलभाजपाला 10 ते 14 जागा मिळतील आपला एकूण 52 टक्के मते मिळतील. तर भाजपाला 34 टक्के मते मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे. दरम्यान, आता मतदानाला काही दिवस उरले असताना दिल्लीतील मतदारांचा कल जाणून घेतला असता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील असा अंदाज टाइम्स नाऊने प्रसारित केलेल्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीला आठवडा उरला असतान टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने मतदारांचा कल जाणून घेतला आहे. त्यानुसार आजच्या घडीला मतदान झाल्याच दिल्लीत आपच बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे.  दिल्लीतील 70 मतदारसंघातील एकूण सात हजार 321 मतदारांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्यात आला आहे. त्यानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला एकूण 52 टक्के मते मिळतील. तर भाजपाला 34 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र मोठा फटका बसणार असून, काँग्रेसला दहा टक्क्यांच्या आत मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये परिवर्तन केल्यास आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील. तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल. 



पण आजच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास मात्र दिल्लीतील लोकसभेच्या सात पैकी सातही मतदारसंघात भाजपाचा विजय होईल, असेही हा सर्व्हे सांगतो. आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला 46 तर आपला 38 टक्के मते मिळतील. तसेच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. पंतप्रधानपदासाठी सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर 8 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावास प्राधान्य दिले आहे.

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

शाहीनबागचे आंदोलन राज्यघटना न मानणाऱ्यांचे; मोदींचा प्रचारसभेत हल्लाबोल

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

दरम्यान, सध्या गाजत असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि शाहीनबाग येथील आंदोलनाबाबतही दिल्लीकरांचे मत या सर्व्हेमधून जाणून घेण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचारणा केली असता तब्बल 71 टक्के लोकांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. तसेच शाहीनबाग येथील आंदोलनाला 52 टक्के लोकांनी विरोध केला आहे. तर 25 टक्के लोकांनी शाहीनबाग येथील आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे.  

Web Title: Delhi Election 2020 : Opinion Poll: AAP will win in Delhi assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.