शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Remedesivir Price Cut: रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा; ‘रेमडेसिविर’ झाले स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 6:23 AM

Corona Virus, Remedesivir Price Cut by 2000 from Now: दरकपात ही तत्काळ लागू करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेला साठादेखील नव्या किमतीनुसार करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. त्यामुळे एकूणच आराेग्य व्यवस्था तसेच हवालदिल झालेल्या रुग्णांना या निर्णयाचा फायदा हाेणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना रुग्णांच्या उपचारामध्ये महत्त्वाचे असलेल्या ‘रेमडेसिविर’ (Remedesivir) या इंजेक्शनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आवाहन केल्यानंतर या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ‘एमआरपी’ घटविली आहे. त्यामुळे देशातील लाखाे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Remdesivir: हे कसले राजकारण? मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन; फडणवीसांचा आरोप

आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी नव्या किमतीसह सरकारचे परिपत्रक ट्विट केले आहे. केंद्रीय रसायने व खत मंत्रालय आणि औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांची गेल्या दाेन दिवसांपासून उत्पादक कंपन्यांसाेबत चर्चा सुरू हाेती. सध्या ७ भारतीय कंपन्या अमेरिकेच्या गिलीड सायंसेजसाेबत करारांतर्गत या औषधाचे उत्पादन करत आहेत. सध्या या औषधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणात ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार हाेत आहे. सरकारकडून ताे राेखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. तसेच उत्पादनही दुपटीने वाढविण्यात येत आहे. कंपन्यांनी किमती कमी कराव्या, असे आवाहन केंद्राने केले हाेते. त्यानुसार कंपन्यांनी किमतीत कपात केली आहे. 

Remdesivir: मोठी बातमी! दमनच्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; फडणवीस, दरेकर पोहोचले

उपलब्ध साठ्यावरही दरकपात तत्काळ लागूदरकपात ही तत्काळ लागू करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेला साठादेखील नव्या किमतीनुसार करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. त्यामुळे एकूणच आराेग्य व्यवस्था तसेच हवालदिल झालेल्या रुग्णांना या निर्णयाचा फायदा हाेणार आहे. काळाबाजार व तुटवडा राेखण्यासाठी सरकारने या औषधाच्या विक्रीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली हाेती. 

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लस पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या. 

केंद्राकडून राज्याला ११२१ व्हेंटिलेटर्सकाेराेनाचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग विचारात घेऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी १,१२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली. काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये आहेत. या राज्यांसाेबत आराेग्यमंत्र्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. राज्यांसाठी पुरेशा व्हेंटिलेटर्सची साेय करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारने नेमली हाेती समितीकाळाबाजार राेखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘रेमडेसिविर’ केवळ काेराेना उपचार करणारी रुग्णालये व संलग्नित औषधी दुकानांच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला हाेता. तसेच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाॅ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली हाेती. 

केंद्र सरकार गाफील - सोनिया गांधी काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी केली. काेराेना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील राहिल्याचे खडे बाेल सुनावतानाच साेनिया यांनी लसीकरणाची वयाेमर्यादा घटविण्याची मागणीही केली.

१०० एमजी इंजेक्शनची किंमतकंपनी    जुने दर (रु.)    नवे दरकॅडिला    २,८००    ८९९सिन्जिन     ३,९५०    २,४५०इंटरनॅशनलडाॅ. रेड्डीज    ५,४००    २,७००सिप्ला    ४,०००    ३,०००मायलॅन    ४,८००    ३,४००ज्युबिलंट    ४,७००    ३,४००हेटेराे    ५,४००    ३,४९०

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस