शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना कधीही हटविता येते

By admin | Updated: September 15, 2016 04:00 IST

अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदावरून ज्योती प्रसाद राजखोवा यांना हटविण्याचा मुद्दा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पटवून देण्याकामी गृहमंत्री राजनाथसिंह यांना चांगलेच कष्ट उपसावे लागले.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदावरून ज्योती प्रसाद राजखोवा यांना हटविण्याचा मुद्दा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पटवून देण्याकामी गृहमंत्री राजनाथसिंह यांना चांगलेच कष्ट उपसावे लागले.७ सप्टेंबर रोजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन राजखोवा यांना राज्यपालपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. तथापि, राज्यपाल म्हणून राजखोवा यांची कृती केंद्र सरकारने मान्य केलेली असताना मी का म्हणून त्यांना या पदावरून हटवावे, हे सरकारने स्पष्ट करावे, असे सांगत राजखोवा यांना हटविण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला होता. पंतप्रधानांना फोनवरून माहिती देताना राजखोवा यांनी सरकारची दिशाभूल केली, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट करूनही राष्ट्रपतींचे समाधान झाले नव्हते.तेव्हा राजनाथ यांनी या घडामोडींची माहिती पंतप्रधानांना दिली होती. अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याशी संपर्क साधून राजखोवा यांना हटविण्यामागच्या कारणांसह प्रस्तावाचा मसुदा तयार करा, असे पंतप्रधानांनी राजनाथ यांना सुचविल्याचे कळते.गृहसचिव राजीव मेहर्षी हे खाजगी दौऱ्यावर जयपूरला होते. तथापि, या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेज अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे पाठविण्यात आली होती.राजखोवा यांच्या नियुक्तीपत्रात त्यांच्या कार्यकाळाबाबतच्या संदर्भात निश्चित अवधीचा उल्लेख नाही. राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राजखोवा राज्यपालपदावर असतील, असे त्यांच्या नियुक्तपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. राज्यपाल म्हणून कोणत्याही निश्चित कालावधीचा नियुक्तीपत्रात उल्लेखच नसल्याने त्यांना हटविण्यासंदर्भात कारण स्पष्ट करण्याची गरज नाही. त्यांना हटविण्याचा अधिकार सरकारचा असून, सरकारच्या शिफारशी मान्य करण्यास राष्ट्रपती बांधील असतात, असे मत अटॅर्नी जनरल यांनी दिले.