शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार लवकरच आणतंय 'हा' नवा कायदा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 26, 2020 16:45 IST

रियल इस्टेट कंपन्यांचे संघटन नारेडकोने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना मिश्रा म्हणाले, स्थलांतरितांसाठी योग्य भाडे गृहनिर्माण संकूल (एआरएचसी) योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमाने शहरांतील झोपडपट्ट्यांना आळा घातला जाऊ शकतो.

ठळक मुद्देयामुळे रियल इस्टेट क्षेत्राला, विशेषतः भाड्याच्या घरांना प्रोत्साहन मिळेल.मंत्रालयने जुलै, 2019मध्ये आदर्श भाडे कायद्याचा मसुदा जारी केला होता.विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला जात आहे.

नवी दिल्ली - सरकार लवकरच आदर्श भाडे कायदा (Adarsh Rent Act) आणण्याच्या तयारीत आहे. गृहनिर्माण व नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे रियल इस्टेट क्षेत्राला, विशेषतः भाड्याच्या घरांना प्रोत्साहन मिळेल.

मंत्रालयने जुलै, 2019मध्ये आदर्श भाडे कायद्याचा मसुदा जारी केला होता. रियल इस्टेट कंपन्यांचे संघटन नारेडकोने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना मिश्रा म्हणाले, स्थलांतरितांसाठी योग्य भाडे गृहनिर्माण संकूल (एआरएचसी) योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमाने शहरांतील झोपडपट्ट्यांना आळा घातला जाऊ शकतो. सरकारने काही महिन्यांपूर्वीच या योजनेची सुरुवात केली आहे.

घराच्या विक्रीत सुधारणा -मिश्रा म्हणाले, अर्थव्यवस्था 'अनलॉक' केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आलेल्या उपायांमुळे आता घरांच्या विक्रीत सुधारणा होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी संपत्तीच्या नोंदणीवरील स्टँप शुल्कदेखील कमी केले आहे. यामुळे घराच्या विक्रीत वृद्धी झाली आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्टॅम्प शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला आहे. जेने करून यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

आदर्श भाडे कायदा तयार -मिश्रा म्हणाले, 'आदर्श भाडे कायदा तयार आहे. विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला जात आहे. याचा मोठा परिणाम होणार आहे.' तसेच, या प्रस्तावित आदर्श भाडे कायद्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी देण्यात आलेला कालावधी 31 ऑक्टोबरला संपुष्टात आला आहे. आता यावर राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आदर्श भाडे कायदा लवकरच येईल, असेही मिश्रा म्हणाले.

रियल इस्टेट क्षेत्राला मिळेल प्रोत्साहन -मिश्रा म्हणाले, 2011च्या जनगणनेनुसार, 1.1 कोटी घरे रिकामी आहेत. कारण लोकांना आपले घर भाड्याने द्यायची भीती वाटते. मात्र, या कायद्यामुळे, सर्व प्रकारच्या विसंगती दूर होतील आणि रियल इस्टेट क्षेत्राला गती मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारReal Estateबांधकाम उद्योग