शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरतावादी NDFBबरोबरच्या करारावर स्वाक्षरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:03 IST

भारत सरकारनं बंदी घातलेल्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड(एनडीएफबी)च्या सर्व गटांच्या प्रतिनिधींबरोबर गृह मंत्रालयानं त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्लीः भारत सरकारनं बंदी घातलेल्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड(एनडीएफबी)च्या सर्व गटांच्या प्रतिनिधींबरोबर गृह मंत्रालयानं त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालही उपस्थित होते. आज केंद्र, आसाम सरकार आणि बोडो प्रतिनिधींबरोबर एक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार आसाम आणि बोडो लोकांसाठी चांगलं भविष्य देणारा आहे. एनडीएफबीच्या सर्वच प्रतिनिधींबरोबर करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अमित शाहांनीही उपस्थितांना संबोधित केलं आहे. 130 हत्यारांसह 1550 कॅडर 30 जानेवारीला आत्मसमर्पण करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री असल्या कारणानं सांगू इच्छितो की, सर्वच आश्वासनं दिलेल्या वेळेत पूर्ण करणार आहोत. बोडो समाजाचं हित लक्षात घेऊन या करारावर एनडीएफबीच्या सर्वच गटांनी हस्ताक्षर केलेले आहेत. अनेक काळापासून बोडो राज्यांची मागणी करत आंदोलन करणाऱ्या ऑल बोडो स्टुडेंट्स युनियन (एबीएसयू)नेसुद्धा या करारावर स्वाक्षरी केली आहे. या त्रिपक्षीय करारावर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, एनडीएफबीचे चार गट, एबीएसयू, गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव सत्येंद्र गर्ग आणि आसामचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शहा