शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बँकांना 20 लाख कोटी रुपयांचा चुना?

By admin | Updated: February 27, 2017 14:00 IST

भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे. फर्स्ट पोस्ट या बेलसाईटला दिलेल्या मुलाखतीत चक्रवर्ती यांनी बँकांनी सांगितलेली आकडेवारी तसेच रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अंदाजापेक्षा बुडीत कर्जाच्या रक्कमेचा आकडा जास्त आहे असा दावा केला आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या थकित कर्जांच्या समस्येचा सामना करत आहे, मात्र, नेमके बुडीत कर्ज किती आहे ते समजून घेतल्याशिवाय या समस्येतून बाहेर पडता येणार नाही असे चक्रवर्ती यांनी सांगितले. नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा एनपीए म्हणजे थकीत कर्ज 6 ते 7 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही आकडेवारी अर्धवट असून, कर्जांची फेररचना, माफ केलेले कर्ज आणि बुडीत कर्ज एकत्र करुन हा आकडा 20 लाख कोटीच्या घरात जातो असे चक्रवर्ती म्हणाले.
 
 
(टेबल सौजन्य - फर्स्टपोस्ट)
 
डिसेंबरपर्यंत भारतातील 42 नोंदणीकृत बँकांचा एनपीए 7.3 लाख कोटी रुपये आहे. बँकांनी कर्जाची केलेली फेररचना आणि माफ केलेले कर्ज याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मार्च 2016 च्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 59,547 कोटीचे कर्ज माफ केले. तर आधीच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्व बँकांनी मिळून कागदोपत्री बंद केलेली कर्जे 1.13 लाख कोटी रुपये आहेत. कॉर्पोरेट कर्जांच्या परतफेडीच्या मुद्यावरुन नेहमीच विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येते. त्यासाठी 9000 कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असलेला व भारतातून फरार झालेल्या विजय माल्या यांचे उदाहरण देण्यात येते.
 2009 ते 2014 या काळात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर असलेल्या चक्रवर्ती यांच्या मते, रिझर्व्ह बँक, बँका, सरकार व अन्य सरकारी नियामक संस्था यांना अद्याप या समस्येचा नीट अंदाजच आलेला नाही. 20 सरकारी बँकांची थकीत कर्जे त्यांच्या कर्जवाटपाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत. 6 बँकांनी 15 टक्क्यांची तर एका बँकेने 22 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.
कर्जवाटप करताना घ्यायची खबरदारी, कंपनीच्या प्रवर्तकांचे नामानिराळे रहाणे, रिझर्व्ह बँकेच्या उपायांची अपरिणामकारकता अशी अनेक कारणे थकीत कर्जे वाढण्यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर थकीत कर्जांचा नीट आढावा घेणे आवश्यक असून, जी कुठली कर्जे वसूल होत नाहीयेत ती थकीत कर्जे समजावीत असा मार्ग चक्रवर्ती यांनी सुचवला आरबीआयच्या सेवेत असताना सुचवला होता, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.