गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:35 IST2025-04-03T16:34:26+5:302025-04-03T16:35:38+5:30
Moradabad car accident: दोन तरुण आणि दोन तरुणी कारने निघाले होते. गुगल मॅपच्या मदतीने ते जात असतानाच चूक झाली आणि दोघींचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू
दोन तरुण आणि दोन तरुणी... चौघे कारने हरयाणाकडे निघाले होते. गुगल मॅपच्या मदतीने रस्त्याने जात असताना अचानक त्यांनी राँग साईडला कार घेतली. त्यानंतर जे घडलं त्यात दोन्ही तरुणींना जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राँग साईडने जात असताना त्यांची कार कंटेनरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचे दरवाजे लॉक झाले. चौघेही अडकले आणि त्यांचा श्वास कोंडू लागला. यात दोन तरुणींचा तडफडून मृत्यू झाला. तर दोन्ही तरुण जखमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मोरादाबादमधील मुंडा पांडे हद्दीतील बायपास रस्त्यावर झाला. एक कार राँग साईडने येत होती. अचानक त्यांची कार समोरून येणार्या कंटेनरवर जाऊन धडकली.
प्राथमिक तपासानंतर जी माहिती समोर आली, त्यानुसार पोलिसांनी कारमधून दोन मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले त्यावेळी कारमध्ये गुगल मॅप सुरू होतं. गुगल मॅपच्या मदतीने ते रस्ता शोधत होते. पण, बायपासवरून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी कार राँग साईड घेतली होती.
वाचा >>मुलाला खेळायला साडीचा झोपाळा बांधला, आई घराबाहेर गेली, अन्...
त्याचवेळी समोरून भरधाव कंटेनर येत होता. कार कंटेनरला जाऊ धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील दोन तरुणी यात जागीच ठार झाल्या तर दोन तरुण गंभीर जखमी झाले.
यूपी : मुरादाबाद में रॉन्ग साइड चल रही कार में कंटेनर ने टक्कर मारी। गेट लॉक होने से कार सवार चारों दोस्त अंदर तड़पते रहे, जिसमें 2 युवतियों शिवानी और सिमरन की मौत हो गई। पुलिस जब पहुंची तो कार में गूगल मैप ऑन मिला। आशंका है कि गूगल मैप की वजह से वो गलत रास्ते पर आ गए। pic.twitter.com/LlKXWjHPDu
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 3, 2025
अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले कोण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील तरुण-तरुणी हे हरयाणातील रोहतकचे होते. ३२ वर्षीय शिवानी आणणि २० वर्षीय सीमरन यांचा मृत्यू झाला. तर राहुल आणि त्याचा मित्र संजू उर्फ आशू हा या अपघातात गंभीर जखमी झाला. हे चौघे ३१ मार्च रोजी नैनीतालला फिरायला गेले होते आणि मंगळवारी रात्री १० परत निघाले होते.