शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मॅपिंग सीबीआय चौकशीच्या फे-यात

By admin | Updated: July 28, 2014 02:42 IST

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेअर जनरलच्या कार्यालयाने केंद्रीय गृहमंत्रालयास दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ही पीई दाखल केली आहे़

नवी दिल्ली : संरक्षण प्रतिष्ठाने, तसेच संवेदनशील भागांचे नकाशे तयार करून(मॅपिंग) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने गुगल या इंटरनेट कंपनीविरुद्ध ‘मैपाथॉन २०१३’ स्पर्धेसंदर्भात प्राथमिक चौकशी(पीई) दाखल केली आहे़अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेअर जनरलच्या कार्यालयाने केंद्रीय गृहमंत्रालयास दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ही पीई दाखल केली आहे़ गुगलने देशाच्या नकाशात सामील नसलेल्या अनेक क्षेत्रांचे मॅपिंग केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे़ गुगलने फेबु्रवारी-मार्च २०१३ मध्ये ‘मैपाथॉन २०१३’ या स्पर्धेचे आयोजन केले होते़ या स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी गुगलने ‘सर्व्हे आॅफ इंडिया’(एसओआय) या देशाच्या अधिकृत मॅपिंग संस्थेची कुठलीही परवानगी घेतली नव्हती़ या स्पर्धेत नागरिकांना आपल्या शेजारचे विशेषत: रुग्णालये, हॉटेल संबंधित ठिकाणांचा तपशील मॅपिंगसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते़ यामुळे चिंतीत एसओआयने गुगलने ‘मैपाथॉन २०१३’ द्वारे मिळविलेला तपशील देण्यास सांगितले़ अनेक संवदेशनशील संरक्षण प्रतिष्ठानांचा आजपर्यंत जाहीर न झालेला तपशील असल्याचे एसओआयला आढळले़ गृहमंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीत एसओआयने याकडे लक्ष वेधले आहे़ दिल्ली पोलिसांद्वारे प्राथमिक चौकशी केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते़ कारण या तपासात देशाच्या विविध स्थानांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे़ गुगल अमेरिकन कंपनी असल्याने या तपासात एफबीआयच्या मदत घेतली जाऊ शकते़गुगल म्हणते...दरम्यान या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना गुगल इंडियाने, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे़ आम्ही राष्ट्रीय कायदे आणि सुरक्षेला गंभीरपणे घेतो़ आम्हाला कुठल्याही गोपनीय मुद्यांबाबत माहिती नाही़ आमच्याकडे असलेला संपूर्ण तपशील आम्ही पुरविलेला आहे़ याउपर आमच्याकडे कुठलीही माहिती नाही, असेही गुगलने स्पष्ट केले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)