गुगलचे CEO सुंदर पिचाईंनी विकलं वडिलोपार्जित घर, 'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे खरेदीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:47 PM2023-05-19T17:47:31+5:302023-05-20T14:26:31+5:30

घराची कागदपत्रं सोपवताना पिचाईंचे वडील भावूक झाल्याचे दिसून आले

google ceo sundar pichai chennai home sold this tamil famous actor becomes buyer see details | गुगलचे CEO सुंदर पिचाईंनी विकलं वडिलोपार्जित घर, 'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे खरेदीदार

गुगलचे CEO सुंदर पिचाईंनी विकलं वडिलोपार्जित घर, 'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे खरेदीदार

googlenewsNext

Google CEO Sundar Pichai house sold out: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे चेन्नईस्थित वडिलोपार्जित घर विकले गेले आहे. त्यांचा बालपणापासून तारुण्यापर्यंतचा काळ या घरात गेला आणि त्यांच्या आयुष्यातील चढ उतार या घराने पाहिले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे हे घर चेन्नईतील अशोक नगर येथे आहे. त्यांचा जन्म या घरात स्टेनोग्राफर लक्ष्मी आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर रघुनाथ पिचाई यांच्या घरी झाला आणि त्यांचे बालपण येथेच गेले. आता त्यांचे हे वडिलोपार्जित घर दुसऱ्याचे झाले आहे. त्याच्या विक्रीशी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

कोण आहे घराचे खरेदीदार?

रिपोर्टनुसार, त्यांनी हे घर तमिळ अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सी मणिकंदन यांना विकले आहे. मात्र, या डीलची रक्कम अद्याप उघड झालेली नाही. पिचाई यांचे वडिलोपार्जित घर विकत घेणारे तमिळ अभिनेते सी मणिकंदन यांनी सांगितले की, या घराची कागदपत्रे सोपवताना सुंदर पिचाई यांचे वडील खूप भावूक झाले, कारण ही त्यांची पहिली मालमत्ता होती. मणिकनंदन यांच्या मते, सुंदर पिचाई हे आपल्या देशाची शान आहेत आणि ते जिथे राहत होते ते घर विकत घेणे ही माझ्या आयुष्यातील अभिमानास्पद कामगिरी आहे.

डीलला लागले ४ महिने

एका वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांच्या घरासाठीचा करार चार महिन्यांपूर्वी सुरू झाला होता आणि आता तो व्यवहार पूर्ण झाला आहे. पिचाई यांचे वडील बराच काळ अमेरिकेत असल्यामुळे या कराराला वेळ लागला. पिचाई यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, वयाच्या २०व्या वर्षापर्यंत त्यांनी या घरात वेळ घालवला आणि सध्या ते शेवटचे ऑक्टोबर २०२१ मध्ये चेन्नईला आले होते. मणिकंदन म्हणाले की, गुगलच्या सीईओच्या पालकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी सांगितले की, घराची कागदपत्रे सोपवताना सुंदर पिचाई यांचे वडील खूप भावूक झाले होते.

गुगलचे सीईओचे वडील तासनतास वाट पाहत होते

सी मणिकंदन म्हणाले की, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पालकांच्या नम्रतेची मला खात्री पटली. सर्वात मोठी बाब म्हणजे घराच्या कागदपत्रांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेदरम्यान ते रजिस्ट्रार कार्यालयात तासनतास थांबले होते. सौदा करण्यापूर्वी त्यांनी घराशी संबंधित सर्व कर भरले. यासोबतच मणिकंदन यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे वडील असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या नावाचा वापर करून हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही.

सुंदर पिचाई यांची संपत्ती

सुंदर पिचाई हे Google सोबत Alphabet Inc चे CEO आहेत. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे सुमारे 10,810 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. गुगलकडून त्यांना 1880 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाते. यासोबतच ते Alphabet Inc ला मोठी रक्कम देतात. एका रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई यांचा मूळ पगार 15 कोटी रुपये आहे आणि त्यांना गुगलने 1865 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. सुंदर पिचाई यांचे वडिलोपार्जित घर विकत घेतलेले तमिळ अभिनेते देखील रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत.

Web Title: google ceo sundar pichai chennai home sold this tamil famous actor becomes buyer see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.