शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:42 IST

देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा

ठळक मुद्देदेशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा फायदा ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी, तसेच ६५.२६ लाख पेन्शनर व्यक्तींना होईल. त्यापायी केंद्र सरकारचे ३८ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा निर्णय १ जुलैपासून पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढविल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र व इतर काही राज्ये तसाच निर्णय घेतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडभरात झालेली ही दुसरी बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली. कोरोना साथीमुळे जानेवारी २०२० पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाई भत्ता वाढवावा अशी शिफारस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंडळाने (जेसीएम) केंद्र सरकारला केली. या निर्णयाने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्क्यांऐवजी २८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. कॅबिनेट सचिव हे जेसीएमचे अध्यक्ष आहेत. यात केंद्रीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व वरिष्ठ सरकारी अधिकारी सदस्य आहेत.

असा वाढणार महागाई भत्तामहागाई भत्ता तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल. महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली आहे व तो मूळ वेतनाच्या (बेसिक) आधारे देण्यात येतो. 

ईपीएफओचे निवृत्त सहायक आयुक्त ए. के. शुक्ला यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना याआधी १७ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात ११ टक्क्यांची वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना आता एकूण २८ टक्के महागाई भत्ता मिळेल. ज्याचा मूळ पगार ३१५८० रुपये असेल त्याला २८ टक्क्यांप्रमाणे दर महिना ८८३४ रुपये महागाई भत्ता मिळेल. याआधीच्या १७ टक्क्यांप्रमाणे हिशेब केला, तर त्या कर्मचाऱ्याला ५३६४ रुपये इतकाच महागाई भत्ता मिळाला असता. 

७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी निकषराज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याकरिता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निकषांच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुधारित वेतनश्रेणी १ जुलै २०१२१ पासून परिणामकारक राहील. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविलेमहाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- ‘अ’मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट ‘अ’मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळ कार्योत्तर मान्यता देण्यात आली. 

शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-२३3 : ६७७००-२०८७०० व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-२० : ५६१००-१७७५००) यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्रProvident Fundभविष्य निर्वाह निधीHealthआरोग्यEmployeeकर्मचारी