वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:53 IST2025-10-04T13:36:58+5:302025-10-04T13:53:02+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने FASTags बाबत नवीन नियम जारी केले आहेत. FASTag शिवाय, टोल शुल्क आता टोल शुल्काच्या दुप्पट नाही तर १.२५ पट असेल आणि UPI वापरून भरता येईल. हा नियम १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
वाहन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. आता वाहनांमध्ये Fastag नसल्यास त्यांना दुप्पट टोल शुल्क भरावे लागणार नाहीत. आता जर चालकाचा Fastag सुरू नसेल तर तो UPI द्वारे टोल भरू शकतो. या दरम्यान त्याला टोल शुल्काच्या १.२५ पट रक्कम भरावी लागेल.
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय टोल शुल्क भरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. नवीन नियमांनुसार, वाहनात फास्टॅग नसल्यास UPI द्वारे पेमेंट करण्याची परवानगी असेल. यासाठी, दीड पट म्हणजे टोल कराच्या १.२५ पट रक्कम भरावी लागेल. केंद्रीय मंत्रालयाने शुक्रवारी नवीन नियमाबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली १५ नोव्हेंबरपासून लागू केली जाणार आहे.
...तर तुम्हाला दुप्पट शुल्क भरावे लागतील
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनावट रोख पेमेंट रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. २०२२ पर्यंत, फास्टॅग पेनेट्रेशन अंदाजे ९८% पर्यंत पोहोचेल, यामुळे टोल बूथवरील सरासरी प्रतीक्षा वेळ ४७ सेकंदांपर्यंत कमी होईल. सध्या, जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा पुरेसा बॅलन्स नसेल, तर त्याला दुप्पट शुल्क भरावे लागेल. नवीन नियम लागू झाल्यामुळे, दंड आता फक्त रकमेच्या दीड पट असेल.
टोल शुल्क प्रत्यक्ष रकमेच्या १.२५ पट असेल
केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, नवीन नियम लागू झाल्यानंतर, जर फास्टॅगमध्ये शिल्लक नसेल, तर UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या वाहनाकडून टोल कराच्या १.२५ पट आकारले जाईल. टोल प्लाझा ओलांडताना इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे पेमेंट अयशस्वी झाल्यास, कोणताही टोल शुल्क आकारला जाणार नाही आणि वाहनाला टोल विनामूल्य ओलांडण्याची परवानगी दिली जाईल.
अनेक वेळा आपण आपल्या FASTag वरील शिल्लक तपासत नाही आणि जेव्हा आपण टोल प्लाझा ओलांडतो तेव्हा शिल्लक नसल्यामुळे आपल्याला दुप्पट रक्कम भरावी लागते. जर आपण हे पैसे रोखीने दिले तर पारदर्शकता नसते. रोख रकमेमुळे दरवर्षी अंदाजे १०,००० कोटींचे नुकसान होते. नवीन नियमानुसार, जेव्हा आपला FASTag शिल्लक कमी असतो, तेव्हा आपण UPI वापरून पेमेंट करू शकतो. या काळात, वाहनचालकांना दुप्पट ऐवजी फक्त दीड पट रक्कम भरावी लागेल.