DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:52 AM2021-05-15T09:52:24+5:302021-05-15T09:53:25+5:30

2-deoxy-D-glucose (2-DG) drug of DRDO: 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत.

Good news! DRDO's 2-DG drug on coronavirus will launch be early next week | DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार

DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार

googlenewsNext

कोरोना रुग्णांवर इलाजासाठी डीआरडीओने (DRDO) बनविलेले औषध 2 डीऑक्सी-डी ग्लूकोज (2-डीजी) चा (DRDO’s 2-DG drug) पहिला 10000 डोसचा पहिली बॅच पुढील आठवड्यात लाँच केली जाणार आहे. डीआरडीओच्या अध्यक्षांनी याआधी हे औषध 11-12 मे रोजी बाजारात आणले जाणार आहे, अशी घोषणा केली होती. आता नव्या वेळेची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Defence Research and Development Organisation’s 2-DG drug for treatment of Covid-19 one week ago, 10,000 doses of the drug are expected to be released in few days.)


11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. या औषधाच्या जोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला २-३ दिवसांमध्ये ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. ते लवकरच बरे होतील, असे ते म्हणाले होते. 


कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर परिणामकारक...
डीआरडीओच्या वैज्ञानिकांनुसार 2 डीजी कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनविरोधात लढण्यास सक्षम आहेत. हे औषध कोरोना व्हायरसच्या प्रोटिनऐवजी मानवाच्या शरिरातील पेशींच्या प्रोटिनमध्ये बदल करते. यामुळे हा व्हायरस पेशींमध्ये राहू शकत नाही. तर अन्य औषधे, लसी य़ा व्हायरसच्या प्रोटीनवर वार करतात. यामुळे जेव्हा व्हायरसचे म्युटेशन होते, तेव्हा अनेक औषधे निष्प्रभ ठरतात. 

आजवर तीनवेळा मानवी चाचण्या
या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओनं म्हटलं आहे. देशभरात ११ रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. तर ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही. 

Read in English

Web Title: Good news! DRDO's 2-DG drug on coronavirus will launch be early next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.