शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Good News : भारतात तयार होत असलेली कोविशिल्ड ९० टक्के प्रभावी, सीरमने दिली खूशखबर

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 3:59 PM

Coronavirus Vaccine Updates:  ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाने एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, युनायटेड किंग्डम आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लस प्रभावी दिसून आली आहे.

ठळक मुद्देरम इंस्टिट्युटने अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ जागांवर लस तयार करण्यात येत आहेदेशातील फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ लाखांच्या वर गेली आहे. तसेच काही भागात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढत आहे. यादरम्यान भारताला मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून काम करत असलेल्या सीरम इंस्टिट्युटने अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले आहे.ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाने एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, युनायटेड किंग्डम आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लस प्रभावी दिसून आली आहे. आधी ही अर्धी लस दिल्यावर ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी दिसून आली आहे. त्यानंतर पूर्ण डोस दिल्यानंतर ६२ टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. त्यानंतर एका महिन्यानंतर पुन्हा दोन पूर्ण डोस दिल्यावर ७० टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. ही लस पुण्यामधील सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येत आहे. ही लस भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने उपलब्ध होणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ जागांवर लस तयार करण्यात येत आहे. या २१२ लसींपैकी १६४ लसी ह्या प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ११ लसी ह्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यामध्ये फायर-बायोएनटेक आणि अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या कोविड-१९ व्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलचे निष्कर्ष जारी केले आहे. मॉडर्ना व्हॅक्सिन ९४.५ टक्के आणि फायझर-बायोएनटेक ९५ टक्के प्रभावी दिसून आली आहे. आता दोन्ही कंपन्या मान्यतेसाठी अर्ज करणार आहेत. त्यानंतर या वर्षअखेरीस यांच्या प्रॉडक्शनची सुरुवात होणार आहे.देशातील फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तर भारतात तयार होत असलेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनलासुद्धा फेब्रुवारीपर्यंत एमर्जंन्सी मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत