गोल्डन मोबाईल क्रमांकाचे आमिष दाखवणारा उजेडात सायबर क्राईमकडून दोषारोपपत्र दाखल

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30

सोलापूर : ओलक्स (ओएलएक्स) कंपनीच्या वेबसाईटवर जाहिरातींतून गोल्डन मोबाईल क्रमांक देण्याचे आमिष दाखवणारा सातारा जिल्‘ातील नागेवाडीतील मुलास सायबर क्राईम विभागाने उजेडात आणले आहे. त्याच्यावर विभागाने येथील न्यायदंडाधिकारी सोनटक्के यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Golden bombshell blamed for cyber crime | गोल्डन मोबाईल क्रमांकाचे आमिष दाखवणारा उजेडात सायबर क्राईमकडून दोषारोपपत्र दाखल

गोल्डन मोबाईल क्रमांकाचे आमिष दाखवणारा उजेडात सायबर क्राईमकडून दोषारोपपत्र दाखल

लापूर : ओलक्स (ओएलएक्स) कंपनीच्या वेबसाईटवर जाहिरातींतून गोल्डन मोबाईल क्रमांक देण्याचे आमिष दाखवणारा सातारा जिल्‘ातील नागेवाडीतील मुलास सायबर क्राईम विभागाने उजेडात आणले आहे. त्याच्यावर विभागाने येथील न्यायदंडाधिकारी सोनटक्के यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
त्याचे असे झाले, डोणगाव भागात राहणार्‍या सचिन अंबादास गायकवाड याने फेब्रुवारी २०१४ मध्ये ओलेक्स कंपनीची वेबसाईट उघडली. गोल्डन मोबाईल क्रमांक देण्याची त्यावर जाहिरात होती. सचिनने जाहिरातीतील संबंधित क्रमांकावर संपर्क साधून ८८८८८१२३४५ या क्रमांकाची मागणी केली. तिकडून संबंधित व्यक्तीने आधार कार्ड आणि ओळखपत्र पाठविण्यास सांगितले. सचिनने स्कॅन करून दोन्ही ओळखपत्रे तिकडे पाठवून दिल्यानंतर त्या व्यक्तीने १५ हजार रुपये खात्यावर भरण्यास सांगितले. पैशाचा विषय आल्यानंतर सचिनने त्याचा नाद सोडला.
दरम्यान, चार-पाच महिन्यांनंतर शहरातील आयडिया कंपनीचा एक प्रतिनिधी सचिन गायकवाड याच्या घरी आला. त्यावेळी कंपनीच्या वेबसाईटवरील ती जाहिरात खोटी असल्याचे गायकवाड याला समजले. सायबर क्राईमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर नागेवाडीतील गणेश जगताप हा उजेडात आला. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, पोलीस उपायुक्त नीलेश अष्टेकर, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घारगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खाडगे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र तेंडुलकर, सचिन गायकवाड यांनी ही कामगिरी केली.
इन्फो बॉक्स
शिक्षेची अशी तरतूद
वेबसाईटवर जाहिरात देऊन त्याद्वारे लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर माहिती व तंत्रज्ञान कलम ६६ सी आणि ६६ डी अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Golden bombshell blamed for cyber crime