शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 04:31 IST

याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते.

नवी दिल्ली/कोची : तिरुवअनंपुरम (केरळ) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीचे पाळमुळे शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिला आणि तिच्या मित्राचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केंद्रीय संस्थांनी केरळ पोलिसांची मदत मागितली आहे.याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने एनआयएला याप्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली. राजनैतिक सुरक्षाप्राप्त व्यक्तीच्या नावाने आखातातून पाठविण्यात आलेल्या सामानात दडविण्यात आलेले १५ कोटी रुपयांचे ३० किलो सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले होते.दरम्यान, कोची येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी (आर्थिक गुन्हे) कोर्टाने केरळस्थित विदेशी महावाणिज्य दूतावरील माजी कर्मचारी सरीत याला १५ जुलैपर्यंत सीमा शुल्क विभागाची कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिलेने अटकपूर्व जामिनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी रात्री तिने आॅनलाईन जामिनासाठी अर्ज दाखल केला.सोने तस्करी प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्यावर निशाणा साधला.राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकांच्या सहकार्याशिवाय सोन्याची तस्करी होणे शक्य नाही, असा संशय व्यक्त करुन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.

टॅग्स :GoldसोनंKeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी