शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:02 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत १७०५ डॉलर प्रती औंस वर पोहोचली होती. तर सोन्यासारखीच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती.

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price) आज मोठी घट होण्याची शक्यता आहे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि वायदा बाजारामध्ये (Gold Price on MCX) मध्ये किंमती घसरल्या आहेत. मंगळवारी दिल्लीमध्ये सोन्याचा दर १० ग्रॅमला 46,833 रुपयांवरून वाढून  47,235 रुपये झाला होता. काल ४०२ रुपयांची वाढ नोंदविली होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत १७०५ डॉलर प्रती औंस वर पोहोचली होती. तर सोन्यासारखीच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती. जाणकारांनुसार शेअर बाजारात पुन्हा तेजी यायला लागली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्यामधून आता शेअर खरेदीकडे लागले आहे. मात्र, भारत आणि चीनमध्ये जो तणाव आहे तो कमी जास्त होत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीमधून नफा वसुली होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत सोन्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यामुळे या परिस्थितीत नफेबाजी उजवी ठरणार आहे. लोक जुने सोने विकत आहेत. कारण त्यांना तेव्हाच्या किंमतीपेक्षा जास्त भाव आता मिळू लागला आहे. 

सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये आर्थिक आणि राजकीय परिस्थिती खूप परिणाम करणारी असते. ही देशातील किंवा जागतिक परिस्थिती असते. जर देशातील सरकारने सोन्याच्या आयातीसंबंधी कोणता नियम लागू करणार असेल तरीही त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतो. याचबरोबर सोन्याची निर्यात करणाऱ्या देशामध्ये उत्पादन कमी झाले तरीही त्याचा परिणाम किंमतीवर होतो. याचप्रमाणे जगातील कोणत्याही घटनेचे परिणाम किंमतीवर जाणवतात, असे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात. 

सोन्याची किंमत कशी ठरते?बाजारात तुम्ही ज्वेलर्सकडून सोने खरेदी करता तो स्पॉट प्राईज भाव असतो. अनेक शहरांमध्ये सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार उघडण्याआधी दर ठरवतात. तर एमसीएक्स बाजारात जो दर ठरविला जातो त्यामध्ये व्हॅट, लेव्ही आणि खर्च जोडला जातो. हाच दर दिवसभर लागू राहतो. यामुळे शहरानुसार सोन्याचे दर बदललेले असतात. याशिवाय सोन्याचा दर हा सोन्याच्या शुद्धतेवर ठरतो. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत वेगवेगळी असते.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

टॅग्स :GoldसोनंGold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजshare marketशेअर बाजार