बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:54 AM2020-06-10T08:54:53+5:302020-06-10T08:58:12+5:30

आई, मोठी बहीण गावी गेल्याने वाचल्या. सातारा परिसरातील कनकोरबेन नगरात ही घटना घडली.

Shocking! double murder of brother and sister in Aurangabad Loot of 1.5 kg of gold jewelery | बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

googlenewsNext

औरंगाबाद : बहिण भावाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून मारेकऱ्यानी बंगल्यातील दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख साडेसहा हजार रुपये लुटून नेल्याची खळबळजनक घटना सातारा परिसरातील कनकोरबेन नगरात मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले. किरण लालचंद खंदाडे - राजपूत (वय १८ वर्ष ) आणि सौरभ लालचंद खंदाडे - राजपूत (वय १६ वर्ष) अशी हत्या झालेल्या बहिणभावाची नावे आहेत . याविषयी प्राप्त माहिती अशी की, सातारा परिसरातील कनकोरबेननगरमध्ये २०१७ पासून बंगला भाड्याने घेऊन लालचंद खंदाडे हे पत्नी, मुली सपना (२१), किरण (१८) आणि मुलगा सौरभ याच्यासह राहत आहेत. त्यांची पत्नी एलआयसीची विमा प्रतिनिधी आहे . खंदाडे परिवाराची जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव येथे शेती आहे. खंदाडे हे शेती व्यवसाय करतात. 


लालचंद यांनी बोलावल्यामुळे आज मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला पत्नी आणि मोठी मुलगी सपना हे कारने पाचनवडगावला गेले होते. तर किरण आणि सौरभ हे घरीच थांबले होते. दुपारी १:२२ वाजता किरणने तिच्या आईला फोन करुन जेवण झाले का विचारले होते. रात्री ८:३० वाजेच्या सुमारास लालचंद यांची पत्नी, मुलगी सपना आणि सासू औरंगाबादला परतल्या तेव्हा त्यांनी गेटमधून मुलाना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद आला नाही . बंगल्याचे दारही लोटलेले होते. सर्वजण आत गेले तेंव्हा त्यांना बाथरुममध्ये किरण आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. दोघांचे गळे धारदार शस्राने कापलेले तसेच डोक्यावर जखमा होत्या. शिवाय घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख साडे सहा हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. 

या घटनेची माहिती त्यांनी फोन करुन गावी असलेल्या लालचंद यांना आणि पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याची घटनास्थळी धाव या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ . राहुल खाडे , पोलीस उपायुक्त मीना मकवाना , सहायक आयुक्त हनुमंत भापकर , सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले , गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली . सोबत ठस्से तज्ज्ञ पथक आणि न्याय वैद्यक शाखेचे पथकाला पाचारण केले . याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .


कॅरम खेळ अर्ध्यावर मोडला 
मयत किरण आणि सौरभ यांना कॅरम खेळाची आवड होती. यामुळे त्यांच्या घरातील एका खोलीत कॅरम बोर्ड होता. दोघे बहीण भाऊ कॅरम खेळताना मारेकरी त्यांच्या बंगल्यात घुसले असावे, यामुळे कॅरमचा खेळ अर्धवट राहिल्याचे कॅरम बोर्ड वरुन दिसत होते . सौरभ दहावीत तर किरण होती पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होते. सौरभ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकत होता . त्याने दहावीची परीक्षा दिली होती तर किरण ही पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत होती . 


मम्मी तुम्ही जेवलात का? 
किरण आणि सौरभ दोघेच घरी होते. सकाळीच आई आणि मोठी बहीण गावी गेली असल्यामुळे किरण हीने आई अनिता याच्या मोबाईलवर दुपारी १:२२ वाजता कॉल करून मम्मी तुम्ही जेवलात असे विचारले . तेव्हा अनिता यांनी जेवण केल्याचे सांगितले. तर अनिता यांनी किरण तुम्ही जेवलात का असा प्रश्न केला असता त्यांनी बिर्याणी खालल्याचे सांगून फोन कट केला हा मायलेकीचा शेवटचा संवाद ठरला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock1 ...तर मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

चार दिवसांनंतर आज सोने स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

 

 

Read in English

Web Title: Shocking! double murder of brother and sister in Aurangabad Loot of 1.5 kg of gold jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.