Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:25 PM2020-06-10T14:25:09+5:302020-06-10T15:02:38+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत १७०५ डॉलर प्रती औंस वर पोहोचली होती. तर सोन्यासारखीच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती.

Gold price likely to be cheaper today after four days; share market is reason | Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

Next

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price) आज मोठी घट होण्याची शक्यता आहे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि वायदा बाजारामध्ये (Gold Price on MCX) मध्ये किंमती घसरल्या आहेत. मंगळवारी दिल्लीमध्ये सोन्याचा दर १० ग्रॅमला 46,833 रुपयांवरून वाढून  47,235 रुपये झाला होता. काल ४०२ रुपयांची वाढ नोंदविली होती. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत १७०५ डॉलर प्रती औंस वर पोहोचली होती. तर सोन्यासारखीच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती. जाणकारांनुसार शेअर बाजारात पुन्हा तेजी यायला लागली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्यामधून आता शेअर खरेदीकडे लागले आहे. मात्र, भारत आणि चीनमध्ये जो तणाव आहे तो कमी जास्त होत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीमधून नफा वसुली होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत सोन्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यामुळे या परिस्थितीत नफेबाजी उजवी ठरणार आहे. लोक जुने सोने विकत आहेत. कारण त्यांना तेव्हाच्या किंमतीपेक्षा जास्त भाव आता मिळू लागला आहे. 

सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये आर्थिक आणि राजकीय परिस्थिती खूप परिणाम करणारी असते. ही देशातील किंवा जागतिक परिस्थिती असते. जर देशातील सरकारने सोन्याच्या आयातीसंबंधी कोणता नियम लागू करणार असेल तरीही त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतो. याचबरोबर सोन्याची निर्यात करणाऱ्या देशामध्ये उत्पादन कमी झाले तरीही त्याचा परिणाम किंमतीवर होतो. याचप्रमाणे जगातील कोणत्याही घटनेचे परिणाम किंमतीवर जाणवतात, असे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात. 


सोन्याची किंमत कशी ठरते?
बाजारात तुम्ही ज्वेलर्सकडून सोने खरेदी करता तो स्पॉट प्राईज भाव असतो. अनेक शहरांमध्ये सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार उघडण्याआधी दर ठरवतात. तर एमसीएक्स बाजारात जो दर ठरविला जातो त्यामध्ये व्हॅट, लेव्ही आणि खर्च जोडला जातो. हाच दर दिवसभर लागू राहतो. यामुळे शहरानुसार सोन्याचे दर बदललेले असतात. याशिवाय सोन्याचा दर हा सोन्याच्या शुद्धतेवर ठरतो. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत वेगवेगळी असते.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

Web Title: Gold price likely to be cheaper today after four days; share market is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.