शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:30 IST

Gold rates Today: कोरोनाची वाढ जरी कमी झाली, कितीही चांगले पॅकेज असले तरीही अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कमीतकमी 2 वर्षे लागणार आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होतच राहणार

नवी दिल्ली : एकीकडे लॉकडाऊनमधून दिलासा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रम नोंदवत असताना सोन्याच्या किंमतींनीही विक्रमी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याच्या दराने 50000 चा आकडा पार केला असून दिल्लींध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50405 रुपयांवर गेली आहे. कोरोनामुळे जगाने धसका घेतल्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देणारे एकमेव सोने हाच पर्याय आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर 51 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सोन्यातील नफेखोरी अशीच सुरु राहिल्यास सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी ऑगस्टमधील वायदा बाजारात सोन्याची किंमत 48,589 झाली होती. अँजेल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यांत 51000 च्या आसपास जाईल. तर मोतिलाल ओस्वालच्या किशोर नर्ने यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत सोन्याच्या किंमती 65 ते 68000 हजारावर जाण्याची शक्यता आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले. 

दोन वर्षे लागणार कोरोनाची वाढ जरी कमी झाली, कितीही चांगले पॅकेज असले तरीही अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कमीतकमी 2 वर्षे लागणार आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होतच राहणार असल्याचे ते म्हणाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर $1,750 प्रती औंस आहेत. याचा अर्थ सोन्याच्या दरांनी जुना $1,690 चा विक्रम मोडीत काढला आहे. आता स्पॉट गोल्डच्या ट्रेडिंगची पातळी to $1,815 प्रति औंसवर गेली आहे, असे मोतिलाल ओस्वालच्या सजेजा यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

टॅग्स :GoldसोनंGold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजcorona virusकोरोना वायरस बातम्या