Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 09:03 AM2020-06-25T09:03:20+5:302020-06-25T09:05:45+5:30

Petrol-Diesel price today रोज 50 ते 60 पैशांनी वाढणाऱ्या इंधनाच्या दराने आज काहीसा दिलासा दिला. आज डिझेलमध्ये 14 पैसे आणि पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. 

Petrol-Diesel price today Unlock1.0 Diesel crosses 80 for the first time; Inflation will rise | Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

Next

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Petrol-Diesel price today) पार उतरलेल्या असताना भारतात मात्र पेट्रोलपेक्षाडिझेलच्या किंमती नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काल देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षाडिझेलचे दर जास्त झालेले असताना आजचा विक्रमही न भूतो असाच आहे. देशात सलग 19 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. 


रोज 50 ते 60 पैशांनी वाढणाऱ्या इंधनाच्या दराने आज काहीसा दिलासा दिला. आज डिझेलमध्ये 14 पैसे आणि पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. 
देशात इंधनाचे सर्वात कमी दर हे आधी दिल्लीमध्ये होते. मात्र, आता त्याच्या उलट झाले आहे. देशात सर्वाधिक दर आता दिल्लीमध्ये आहेत. आज दिल्लीमध्ये डिझेलची किंमत 79.88 रुपयांनी वाढून 80.02 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर 86.70 आमि डिझेल 78.34 रुपये झाला आहे. यानंतर चेन्नईमध्ये डिझेल 77.29 रुपये झाला आहे. 


दिल्लीत किंमती का वाढत्या?
देशभरात इतर ठिकाणी मात्र पेट्रोल डिझेलमध्ये कमालीचे अंतर आहे. महाराष्ट्रात हे अंतर 8 रुपयांचे आहे. दिल्लीने पेट्रोलवर कमी कर आकारत डिझेलवर जास्त कर लावला आहे. प्रदूषणामुळे डिझेलचा वापर कमी करावा हा त्यामागचा मूळ उद्देश असला तरीही महसूलही महत्वाचा असल्याने डिझेलवरील कर जास्त आहे. 2014 मध्ये इंधनाच्या किंमतींचे डिरेग्युलरायझेशन करण्यात आले आहे. यानुसार आता दिवसाला इंधनाच्या किंमती बदलल्या जातात. दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के आणि डिझेलवर 63 टक्के कर आकारला जातो. कर जवळपास समान असल्याने पेट्रोल आणि डिझेलमधील अंतर जवळपास समान झाले आहे. 


तुमच्या शहरातील दर असे जाणून घ्या...
पेट्रोल-डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. आधी ते रात्री 12 वाजल्यापासून लागू होत होते. तुमच्या शहरातील इंधनाचा दर तुम्ही एका एसएमएसने जाणून घेऊ शकता. (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 वर पाठवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबरवर मेसेज पाठवून दर मिळवू शकतात. तर एचपीसीएलचे ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवू शकतात. 

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

'हे तर टोपी नसलेले तबलिगी'; जगन्नाथ रथयात्रेवरून मोदींच्या खास मित्राचे वादग्रस्त विधान

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

रेल्वेसेवा कधीपर्यंत बंद राहणार?; रेल्वे खात्याने दिले स्पष्ट संकेत

 

Web Title: Petrol-Diesel price today Unlock1.0 Diesel crosses 80 for the first time; Inflation will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.