गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही नवनिर्माण सेनेचा इशारा

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:29+5:302014-12-28T23:40:29+5:30

मेरठ - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथूराम गोडसे याचे मंदिर मेरठमध्येच काय तर संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि देशाच्या इतर कुठल्याही राज्यात कदापि बांधू दिले जाणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने (यूपीएनएस) रविवारी दिला.

Godse's temple will not let the Navin Sena's warning | गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही नवनिर्माण सेनेचा इशारा

गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही नवनिर्माण सेनेचा इशारा

रठ - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथूराम गोडसे याचे मंदिर मेरठमध्येच काय तर संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि देशाच्या इतर कुठल्याही राज्यात कदापि बांधू दिले जाणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने (यूपीएनएस) रविवारी दिला.
संघटनेचे अध्यक्ष अमित जानी येथे आयोजित एका बैठकीत एका नि:शस्त्र संताला गोळ्या घालून ठार करणारी व्यक्ती हिंदूंचे दैवत कसे होऊ शकते? असा सवाल उपस्थित केला आणि असे मंदिर कुणी बांधले तर ते उद्ध्वस्त करण्यात येईल, असा इशारा दिला. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शहरात शारदा मार्गावर नाथूराम गोडसेचे मंदिर बांधण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी लगेच कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. तर दुसरीकडे यूपीएनएसने मंदिर निर्मात्यांसोबत रस्त्यावरच निपटण्याचा इशारा दिला असल्याने, हिंदू महासभा आणि नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या मुद्यावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे.
गेल्या बुधवारी शारदा मार्गावरील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसेच्या कथित मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महासभेचे सरचिटणीस आचार्य मदन यांनी गोडसेची प्रशंसा केल्याचेही सांगितले जाते. त्यांनी राममंदिर आणि जम्मू-काश्मिरातील ३७० कलम हटविण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली होती. याप्रकरणी मदन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Godse's temple will not let the Navin Sena's warning