शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थस्थळांचे कचरा व्यवस्थापन कसोशीने करण्याचा निर्धार

By admin | Updated: October 29, 2015 22:07 IST

भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच, प्रमुख तीर्थस्थळे स्वच्छ व सुंदर बनवण्याची मोहीम केंद्रीय पर्यटन, तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तीर्थस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रचलित नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच राज्य सरकारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे केंद्राने ठरवले आहे.हिंदू देवालयात खरी समस्या देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या फुला- पानांसह पूजा साहित्यातून गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीची आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता या निर्माल्याची विल्हेवाट योग्यप्रकारे कशी लावता येईल, यावर व्यापक विचारविनिमय सध्या सुरू आहे. प्लास्टिकवर सर्रास बंदी घालण्याऐवजी राज्य सरकारच्या सहकार्याने तीर्थस्थळांवर प्लास्टिक उत्पादनांचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपवण्याचे कडक निर्बंधही लवकरच घालण्यात येणार आहेत. तीर्थस्थळांवर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, यासंबंधी राज्य सरकारांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यांनी अनेक चांगले प्रस्तावही पाठवले आहेत. या कचरा व्यवस्थापनात मुख्य भूमिका नगरपालिका, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना वठवावी लागणार आहे. देवालयातल्या जलाभिषेकाचे पाणी, तेल, तूप, दूध, पंचामृत, नैवेद्यात वाहिलेली फळे, इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी गटाराद्वारे गंगेच्या प्रवाहात सोडल्या जातात. नव्या नियमांनुसार तीर्थस्थळाच्या गावात सांडपाण्याचे नाले, गटारी यांचे योग्य प्रकारे निस्सारण (रिसायकलिंग) केल्यानंतरच हे पाणी नद्यांमधे सोडता येईल. त्याच्या कठोर प्रबंधनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल.