'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:35 IST2025-05-19T19:32:50+5:302025-05-19T19:35:24+5:30
Spying for Pakistan Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं एक मोठं नेटवर्क समोर आले आहे. तीन राज्यात ११ हेरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती तपासातून दररोज समोर येत आहे.

'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
Spies for Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरनंतर देशात खळबळ उडाली, ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचे नेटवर्क समोर आल्यानंतर! मागील तीन दिवसांत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ११ जणांना अटक करण्यात आलीये. यात एक आहे, नोमान इलाही! त्याने पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवल्याचे समोर आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानशी कनेक्शन असलेल्यांचा जेव्हा धांडोळा घेतला, तेव्हा देशभरात खळबळ उडाली. आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या लोकांच्या माध्यमातून भारतातील ठिकाणांची आणि लष्करी तळांची रेकी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नोमान इलाही आणि आयएसआय एजंय इकबालमध्ये काय झालं होतं बोलणं?
पोलिसांच्या तपासातून नोमान इलाही हा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या संपर्कात होता, हे समोर आले आहे. तो आयएसआयचा एजंट इकबाल काना यांच्या संपर्कात होता. नोमान आणि इकबाल यांच्यातील एक चॅट आणि ऑडिओ कॉल संभाषणही तपास यंत्रणांना मिळाले आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार दोघांमध्ये असा संवाद झाला होता.
वाचा >>"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
नोमान - साहेब प्लीज मला माफ करा. माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्या पाठिशी आहात.
इकबाल - तू माझं काम करणार आहेस का? आता कधी काम करणार तू? लष्कराचे दोन फोटो दे.
नोमान - मला फक्त दोन दिवस द्या.
इकबाल - काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये.
नोमान - ठीक आहे.
इकबाल - गुड.
कॉल करून नोमानला काय सांगितलं गेलं?
त्याचबरोबर नोमान इलाही याला आयएसआयचा एजंट इकबाल काना याने कॉल केला होता. त्याने नोमानला कॉल करून सांगितलं होतं की, जालंदर आणि अमृतसर मार्गे जम्मू काश्मीरकडे जी रेल्वे एक्स्प्रेस येते, तिचे लोकेशन पाठव आणि जाऊन बघ की त्यातून किती लोक प्रवास करत आहेत. इकबालला उत्तर दिल्यानंतर नोमानने त्याचा व्हिडीओ कॉलचे संभाषण डिलीट करून टाकलं होते.
नोमानकडे आहेत ६ पासपोर्ट
तपास केल्यानंतर आणखी एक माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली. ती आणखीच धक्कादायक आहे. नोमान इलाही याच्याकडे ६ भारतीय पासपोर्ट आहेत. त्याच्या प्रत्येक पासपोर्टवर पाकिस्तानचा दौरा केल्याची नोंद आहे. नोमानकडे पाकिस्तानी संशयित कागदपत्रेही मिळाली आहेत.