शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार नसणारेच काढतायत 'बेरोजगारी हटाव' यात्रा; केंद्रीय मंत्र्यांचा तेजस्वी यादवांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:52 IST

विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नाकारण्याचे जनतेने आधीच ठरवून घेतले आहे. विरोधक आताही बेरोजगार असून निवडणुकीनंतर देखील बेरोजगारच राहणार असल्याचे गिरीराज सिंह यांनी नमूद केले.  

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या बेरोजगारी हटाव यात्रेवर खोचक टीका केली आहे. त्यांनी या यात्रेला उद्देशून तेजस्वी यादव यांच्या बेरोजगारीवर बोट ठेवले आहे.

ज्या लोकांकडे स्वत:साठी रोजगार नाही तेच लोक 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढत असल्याचे गिरीराज सिंह म्हणाले.  पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते. बेरोजगारी हटाव यात्रा काढणारे लोक कोण विरोधी पक्षाचे नेते आहे. त्यांच्याकडे काहीही काम उरले नसल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये 15 वर्षे सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांनी रोजगारासाठी काहीही केले नाही. बेरोजगारीमुळे लोकांना बिहार सोडून जावं लागल्याचे गिरीराज सिंह यांनी म्हटले. 

बिहारमध्ये जे रोजगार देऊ शकत होते, त्यांना व्यापार करू दिला नाही.जनतेला सर्वकाही ठावूक आहे. बेराजगारी यात्रा काढल्याने काहीही फरक पडणार नाही. यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नाकारण्याचे जनतेने आधीच ठरवून घेतले आहे. विरोधक आताही बेरोजगार असून निवडणुकीनंतर देखील बेरोजगारच राहणार असल्याचे गिरीराज सिंह यांनी नमूद केले.  

तेजस्वी यादव एनआरसी, सीएए आणि एनपीआरसह बेरोजगारीच्या मुद्दावर यात्रा काढत आङे. येत्या 23 फेब्रुवारी पासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी हायटेक गाडी बनविण्यात आली आहे