शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

विजेच्या समस्येवर शेतकऱ्यांचा जबरदस्त तोडगा, आंदोलन स्थळावर लावले सोलार पॅनल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 4:30 PM

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

नवी दिल्ली - येथे प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुरुवारी सरकारकडून शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात, गाझीपूर बॉर्डरवरील आंदोलन स्थळावरील टेंट काढून, तेथील वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला होता. मात्र, तरीही त्याचा शेतकऱ्यांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. उलट, यावर तोडगा काढत या शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी विजेच्या व्यवस्थेसाठी सोलार पॅनल आणि सोलार इंव्हर्टर लावायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर मोबाईल चार्ज करण्यासाठी या शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्सदेखील तयार केले आहेत.

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 26 जानेवारीनंतर आता आंदोलन जवळपास संपले आहे, असे वाटू लागले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी राकेश टिकैत यांचे व्हिडिओ टीव्हीवर दाखविण्यात आल्याने परिस्थिती पुन्हा वेगाने बदलली आणि शेतकरी पुन्हा आंदोलन स्थळी परतायला सुरुवात झाली. 

Farmer protest: आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?

गाझीपूर बॉर्डरवर भारतीय किसान यूनियन (बीकेयू)च्या समर्थक शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मेरठ, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुराबादाबाद तसेच बुलंदशहरासारख्या पश्चिम उत्तर प्रदेशामधील जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी यूपी गेटवर पोहोचले आहेत. केंद्र सरारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गेल्या 28 नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

गाझीपूर बॉर्डरवर अद्यापही मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. तसेच आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.

Farmer Protest: शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर; पंतप्रधान मोदींची भावनिक साद

मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना घातली भावनिक साद - कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकते. संवादाचे द्वार नेहमीच खुले आहे, असे पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत म्हणाले. 'कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या विधानाचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नसला तरीही आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी यावर चर्चा करावी. शेतकरी आणि माझ्यात केवळ एका कॉलचे अंतर आहे,' असे मोदींनी म्हटले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश