शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षण स्वस्त करा! संघाचा सरकारला आदेश

By admin | Updated: September 8, 2014 02:17 IST

उच्चशिक्षण स्वस्त करा, ते आर्थिकदृष्ट्या माफक कसे करता येईल याचा विचार करा, असे स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिले.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीउच्चशिक्षण स्वस्त करा, ते आर्थिकदृष्ट्या माफक कसे करता येईल याचा विचार करा, असे स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिले. जोवर सामाजिक भेदभाव आहे तोवर आरक्षणाला संघाचे समर्थन आहे, या भूमिकेचाही पुनरुच्चार केला.माफक दरातील शिक्षणाचा विषय रेटताना भागवत म्हणाले, की ४० वर्षे मी ज्या स्वयंसेवकाच्या घरी अनेकदा भोजन केले, त्याची जात कधीच मी विचारली नाही. तो एक्साइज विभागात अधिकारी आहे; पण त्याच्या मुलीच्या कॉलेज प्रवेशाच्या वेळी शिक्षण महाग झाल्याची गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. प्रवेशासाठी त्या स्वयंसेवकाकडे ३२ लाख रुपये मागण्यात आले. प्रवेश अर्ज भरताना त्याने जातीच्या आरक्षणावर टीक मार्क केले नव्हते. ते केले असते तर ७-८ लाखांत प्रवेश झाला असता, असे सांगून भागवत म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने माझ्या वाट्याचे फायदे गरजूंना मिळावे म्हणून आपण आरक्षण घेतले नसल्याचे तो स्वयंसेवक म्हणाला. या भावनेचा आदर करून देशातील उच्चशिक्षण स्वस्त कसे होईल याचा विचार करा, असे त्यांनी सुनावले. समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाची संधी मिळायला हवी.राष्ट्रीय अनुसूचित जाती व जनजाती आयोगाचे अध्यक्ष विजय सोनकर शास्त्री यांच्या ‘हिंदू चर्मकार जाती, ‘हिंदू वाल्मिकी जाती’ व ‘हिंदू खाटीक जाती’ या शोधग्रंथांचे प्रकाशन रविवारी राजधानीत झाले. त्या कार्यक्रमात सरसंघचालक भागवत यांनी सरकारला ही सूचना केली. तेव्हा केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते.