शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

अकोला : महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात आली असली तरी सर्वाधिक गुदगुल्या विरोधी पक्ष भाजपा-शिवसेनेला झाल्याचे चित्र आहे. यादरम्यान, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील संभाव्य नगरसेविकांच्या पदरी घोर निराशा आली.

अकोला : महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात आली असली तरी सर्वाधिक गुदगुल्या विरोधी पक्ष भाजपा-शिवसेनेला झाल्याचे चित्र आहे. यादरम्यान, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील संभाव्य नगरसेविकांच्या पदरी घोर निराशा आली.
राज्यभरातील २६ महापालिकेतील महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर राज्याचे नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, अकोला मनपासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. मार्च २०१२ मध्ये महापौरपदाकरिता अनुसूचित जाती (एससी प्रवर्ग) प्रवर्गातील महिला उमेदवाराचे आरक्षण निघाले होते. त्यावेळी महापौरपदावर भारिप-बहुजन महासंघाच्या ज्योत्स्ना गवई विराजमान झाल्या होत्या. येत्या ९ सप्टेंबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येत आहे. यादरम्यान, अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची इच्छुक नगरसेविकांना अपेक्षा होती. तसे न झाल्यामुळे आता या पदावर विराजमान होण्यासाठी सर्वच ३८ इच्छुक महिला नगरसेविकांमध्ये जोरदार रस्सीखेच पहावयास मिळणार आहे.

बॉक्स..
विरोधी पक्षाने सोडला सुटकेचा नि:श्वास
महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी निघेल, अशी दाट शक्यता वर्तविली जात होती. काँग्रेस पक्षाकडे संबंधित प्रवर्गाच्या दोन महिला नगरसेविका असल्यामुळे त्यानुसार काँग्रेसने तयारीदेखील केली होती. तर विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेकडे या प्रवर्गातील उमेदवारच नसल्यामुळे विरोधी पक्षाला हात चोळत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने विरोधी पक्षाच्या आशा पल्लवित झाल्याचे एकंदरितच चित्र आहे.