Gehlot government called Emergency meeting at night;, two dozen MLA with Sachin pilot | Rajasthan political crisis: गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

Rajasthan political crisis: गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

जयपूर : राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यांच्याकडे 24 ते 25 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी रात्री मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात याकडे लक्ष लागले आहे. 


शनिवारी दुपारी भाजपाच्या दोन नेत्यांना सरकार पाडण्याचे कारस्थान रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. याच एसओजीने पायलट यांनाही नोटीस पाठविली असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यावर पाय़लट नाराज झाले असून वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तर ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे. या साऱ्या परिस्थितीवर भाजपा बारीक लक्ष ठेवून आहे. 


गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये सरकार बनल्यापासूनच त्यांच्यात वाद असल्याचे समोर येत होते. त्यात ज्योतिरादित्य शिंदे हे पायलट यांचे मित्र असल्याने ते सारी शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे. शिंदे यांना मध्य प्रदेशमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. पायलट यांच्या गटामध्ये 25 आमदार असल्याचे बोलले जात आहे. यापैकी डझनभर आमदारांना पायलट दिल्लीला घेऊन गेले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला जाण्याचा प्रयत्न आहे. हे आमदार गुडगावच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेले असून काही अन्य आमदार दिल्लीच्या आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. पायलट यांच्यासह हे आमदार गेहलोत यांच्या हाताबाहेर असल्याचे सांगितले जात आहेत. त्यांचे फोन बंद येत आहेत. यामुळे गेहलोत यांनी या आमदारांना जाऊन प्रत्यक्ष भेटण्याचे आदेश त्यांच्या गटातील मंत्र्यांना दिले आहेत. नाराज सचिन पायलटही कोणत्याही काँग्रेस नेत्याचा फोन उचलत नाहीएत. पक्षातील मित्र, पत्रकारांचाही ते फोन उचलत नाहीएत. 


शिंदे-पायलट मैत्री सर्वश्रूत
मध्य़ प्रदेश आणि राजस्थानमध्ये निव़डणुकीवेळी काँग्रेसने तरुण चेहऱ्यांचा डाव खेळला होता. शिंदे यांना तिथे ना मुख्यमंत्री पद मिळाले नाही प्रदेशाध्यक्ष पद. तर राजस्थानमध्ये पायलटना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे नाराज असलेल्या शिंदे यांनी भाजपमध्ये जात राजकीय धुरिणांनाही धक्का दिला होता. दुसरीकडे सरकार पाडले होते. तेव्हापासून पायलट देखील ट्रेंड करू लागले होते. जर गेहलोत सरकारवर काही संकट आले तर त्य़ामध्ये शिंदे यांचा हात असल्याचे नाकारता येणार नाही, असे राजकीय धुरिणांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gehlot government called Emergency meeting at night;, two dozen MLA with Sachin pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.